रस्ते दुरुस्ती व नालेसफाईची डेडलाईन पाळण्यात पालिका अपयशी

मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – पावसाळा तोंडावर आला असताना मुंबईमधील रस्ते आणि नालेसफाईची कामे पूर्ण करण्यासाठी ३१ मे ची डेडलाईन महापालिका प्रशासनाने जाहीर केली होती. प्रशासनाने जाहीर केलेली ही डेडलाईन पाळण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. मुंबई महापालिका नालेसफाईची कामे योग्य रित्या पूर्ण करत नसताना डेडलाईन पाळण्यातही अपयश आल्याने खुद्द नगरसेवकांनी खंत व्यक्त केली आहे.

मुंबईमधील रस्ते आणि नालेसफाईची पाहणी करण्यासाठी बुधवारी (३१ मे) पत्रकारांचा दौरा आयोजित करण्यात आला. या दौऱ्या दरम्यान महापालिकेने रस्ते दुरुस्ती आणि नाले सफाई कशी केली हे दाखवण्याचा प्रयतन करण्यात आला. एफ दक्षिण मधील रोड नंबर ३७ पालिकेने महिन्याभरापूर्वी केल्याचे अधिकारी सांगण्याचा प्रयत्न करत होते. मात्र येतील स्थानिकांनी हा रस्ता ४ ते ५ महिने आधीच बनवण्यात आला असल्याचे सांगण्यात आल्याने पालिका अधिकाऱ्यांनी एक महिन्यापूर्वी काम झाल्याचा दावा खोटा ठरला आहे. महापालिकेचे मुख्यालय मुंबई शहर विभागात आहे. या शहर विभागातील वडाळा ब्रिज चर्च रोड, दादर भोईवाडा येथील जी. डी. आंबेकर मार्ग, परेल येथील जेरबाई वाडिया मार्ग या रस्त्यांची कामे अद्याप सुरु असून डेडलाईन संपली तरी याला रस्त्यांची कामे अपूर्ण अवस्थेत होती.

दोन दिवसापूर्वी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांच्यासह नालेसफाईची पाहणी केली होती. या पाहणी दरम्यान वडाळा येथील कोरबा मिठागर नाला साफ झाला नसल्याचे समोर आले होते. आज बुधवारी याच नाल्याला पुन्हा भेट दिली असता आहे तीच परिस्थिती त्या ठिकाणी दिसली. पत्रकार येणार म्हणून कर्मचाऱ्यांना कोणत्याही सोयी सुविधा न देताच, सुरक्षेची काळजी न घेताच या नाल्यात सफाईसाठी उतरवण्यात आले होते. या बाबत स्थानिक नगरसेविका पुष्पा कोळी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अधिकाऱ्यांना ओरडून ओरडून सांगितले तरी नालेसफाई केली जात नसल्याची खंत व्यक्त करत या पावसाळ्यात येथील स्थानिक नागरिकांना त्रास होणार असल्याची चिंता कोळी यांनी व्यक्त केली. तर गोरेगाव येथील भाजपाचे नगरसेवक संदीप पटेल यांनी इतर ठिकाणी कामे सुरु असली तरी पी दक्षिण आणि के पश्चिम वॉर्ड मधील भांडणामुळे अद्याप ओशिवरा नदीमधून गाळ काढला गेला नसल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget