ओल्या कच-यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया न केल्यास पालिका कारवाई करणार

गृहनिर्माण व व्यावसायिक संकुलांचे पालिका वीज, पाणी पुरवठा खंडीत करणारमुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – मुंबईमुंबई मधील सुमारे 20 हजार चौ. मीटर आणि त्यापेक्षा अधिक चटईक्षेत्र असलेल्या गृहनिर्माण आणि व्यावसायिक संकुलांना ओल्या कच-यावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करणे आता बंधनकारक राहणार आहे तसे न केल्यास पालिकेच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे ओला कच-यावर प्रक्रिया न करणा-या गृहनिर्माण सोसायट्या, व्यापारी संकुलांचा वीज व पाणी पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे

पालिकेने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ मुंबई करण्यासाठी पालिका प्रशासनाने कामाला सुरुवात केली आहे. ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी पालिकेचे गृहनिर्माण सोसायटयाना आदेश आहेत. याचाच एक भाग म्हणून मुंबईतील 20 हजार चौरस मीटर व त्यापेक्षा अधिक चटईक्षेत्र असलेल्या गृहनिर्माण व व्यावसायिक संकुलांना ओल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दती ने प्रक्रिया करणे बंधनकारक केले आहे. पालिकेने तीन महिन्यांपूर्वी तसे आदेश दिले आहेत. या आदेशाची अमलबजावणीला 1 एप्रिल पासून सुरुवात झाली आहे. मुंबईतील ज्या सोसायट्या व व्यावसायिक संकुले प्रक्रिया करण्याकडे दुर्लक्ष करतील त्यांना नोटिस देऊन समज दिली जाईल. मात्र त्यानंतरही आदेश धाब्यावर बसवल्यास पालिकेने सबंधित सोसायट्या व संकुलांवर पर्यावरण कायद्यानुसार नोटिस पाठवण्याची प्रक्रिया कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या नियमाची बहुतांशी सोसायट्या, संकुलांनी अमलबजावणी करण्याकडे दुर्लक्ष केल्याचे आढलल्यानंतर अशा सोसाय़ट्या व संकुलाना पालिकेने नोटिसा बजावल्य़ा आहेत. फार कमी लोकांनी नोटिसांना उत्तर देऊन आदेशाची अमलबजावणी करण्याचे ठरवले आहे. परंतु ज्या सोसायट्या, संकुलांचे नोटिसांना उत्तर समाधानकारक न मिळाल्याने पालिकेने अशांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच सोसाय़ट्या, संकुलांचे वीज व पाणी जोडणी कापण्यासाठी यादी तयार केली जात आहे
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget