भाजपा आज र-थायी समितीत सत्ताधाऱ्यांना पकडणार कोंडीत


मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) –देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणली जाणारी मुंबई पालिका ही दिड कोटी जनतेला मुलभूत सेवा सुविधा पुरवत आहे या मुंबईकरांकडून शंभर टक्के कर घेतला जातो मग रस्त्यांची आणि नालेसफाईची कामे शंभर टक्के का होत नाहीत असा सवाल भाजपने शिवसेनेला केला केला असून आज शुक्रवारी होणाऱ्या पालिका र-थायी समितीत शिवसेनेला चांगलेच कोंडीत पकडण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे या मुंबई व उपनगरांत रस्त्यांची कामे तसेच नालेसफाई धिम्या गतीने सुरू आहेत. पावसाळा तोंडावर आला तरी नालेसफाईच्या कामाला वेग आलेला नाही. नालेसफाईची पूर्ण झालेली नाहीत आणि ती पूर्ण होण्याची शक्‍यताही नाही. या कामासाठी पालिकेने कंत्राटदार नेमले आहेत. मात्र त्यांच्याकडे साधनसामुग्री आणि मनुष्यबळ अपूरे आहे. त्यामुळे नालेसफाईची कामे अत्यंत धिम्या गतीने सुरू आहेत. रस्त्यांच्या कामांची कंत्राटे ज्या कंत्राटदारांना दिली आहेत, ते कंत्राटदार काळ्या यादीत टाकलेले आहेत. हे काळ्या यादीतील कंत्राटदार दुसऱ्या नावाने रस्त्यांची कामे करीत आहेत. त्यामुळे नालेसफाई तसेच रस्ते कामात मोठा सावळा गोंधळ सुरू असल्याची टीका पालिकेतील भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी केली आहे. पालिका प्रशासनाने 78.47 टक्के नालेसफाईची कामे पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. मात्र ही टक्केवारी मुंबईकरांची फसवणूक आहे. मुंबईकरांकडून शंभर टक्के कर घेता मग नाले, रस्ते तसेच नागरी सुविधांची कामे शंभर टक्के का होत नाहीत भायखळा येथील राणीबागेतील दरवाढीला आमचा विरोध आहे असा सवाल कोटक यांनी केला आहे. त्यामुळे भाजपने नाले आणि रस्ते कामावरून शिवसेनेला खिंडीत पकडले असून या मुद्‌द्‌यावरून दोन्ही पक्षात सामना रंगण्याची शक्यता आहे.

पालिका र-थायी समितीत आज हल्ला बोलमुंबईकराच्या रुपाने घेतलेल्या पैशातून लोकांना चांगल्या दर्जाच्या नागरी सुविधा का देत नाही,ही शंभर टक्के सेवा प्रथम दया तसेच भायखळा येथील राणीबागेतील दरवाढीचा प्रस्ताव आज र-थायी समितीत आला आहे या प्रस्तावाला आम्ही कडाडून विरोध करणार आहोत आणि नाले सफाई रर-त्यांची कामे एकदम धिम्या गतीने सुरू आहे अशा अनेक प्रश्नांवर आम्ही हल्ला बोल करणार आहोत र-थायी समितीत सत्ताधारी याना जाब विचारणार आहोत
पालिका भाजपा गटनेते मनोज कोटक
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget