मुंबई पालिकेतील नगरसेवकांना पाहिजे राज्य भरात टोलमाफी


राज्य सरकारकडे पुढील अभिप्रायसाठी ठरावाची सूचना दाखल -
मुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) – देशात सर्वात मोठी आणि श्रीमंत म्हणून ओळख असलेल्या मुंबई पालिकेत 227 नगरसेवक आहे खासदार आणि आमदार यांना ज्याप्रमाणे सर्व टोल नाक्यांवर विनामूल्य प्रवासाची मुभा दिली जाते त्याच धर्तीवर नगरसेवकांनाही राज्यातील सर्वच टोल नाक्यांवर टोलमाफी देण्यात यावी अशी ठरावाची सूचना शिवसेनेचे नगरसेवक तुकाराम पाटील यांनी केली आहे ही ठरावाची सूचना राज्य शासनाकडे पुढील अभिप्रायसाठी पाठवण्यात आली आहे त्यामुळे नगरसेवकांना टोल माफी मिळणार की नाही याकडे सवाॅचे लक्ष लागून राहिले आहे

सोन्याची अंडी देणा-या मुंबई पालिकेत 227 नगरसेवक आहेत हे नगरसेवक मुंबईतील विविध प्रश्नांवर पालिका सभागृहात आवाज उठवत असतात तसेच या नगरसेवकांना अनेक उपक्रमांना भेटी देण्यासाठी व त्यांची पाहणी करण्यासाठी अनेक वेळा शहराबाहेर जावे लागत असते अशावेळी मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंक वगळता मुंबईबाहेरील सर्व टोलनाक्यांवर टोल भरावा लागतो. याउलट खासदार व आमदार यांना राज्यातील सर्व टोलनाक्यांवर विनामूल्य प्रवास करण्याची सवलत देण्यात येते. त्यामुळे या खासदार व आमदारांना देण्यात येणाऱ्या सवलतीच्या धर्तीवर मुंबई पालिकेच्या नगरसेवकांना राज्यातील सर्व टोलनाक्यांवरून विनामूल्य प्रवास करण्याची सवलत देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना नगरसेवक तुकाराम पाटील यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. त्यानुसार ही सूचना मंजूर करत पालिका सभागृहात ठराव करून राज्य सरकारकडे पुढील अभिप्रायसाठी पाठवण्यात आला आहे. मुंबईमध्ये अनेक महत्वाचे प्रकल्प राबवले जात असून शहरातील सुमारे सव्वाकोटी जनतेला अत्यावश्यक नागरी सुविधा पुरवण्यासाठी पालिकेचे नगरसेवक सातत्याने कार्यरत असतात. यासाठी नगरसेवकांना मुंबईबाहेर विविध राजकीय व सामाजिक मेळाव्यांना उपस्थित राहावे लागते. तसेच महाराष्ट्र राज्यातील प्रमुख शहरांमध्येही राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांनाही भेटी देण्यास जावे लागते. त्यामुळे राज्यातील सर्व टोल नाक्यांवर नगरसेवकांना टोलमाफी मुंबईच्या नगरसेवकांना दिली जावी, अशी भूमिका शिवसेनेने मांडली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget