नाल्‍यातील गाळाची आकडेवारी व कामांची माहिती रोज सोशल मि‍डियावर जाहीर करा

कंत्राटदार व साईट इंजिनिअरचे नंबर मुंबईकरांसाठी जाहीर करा
मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) – मुंबईतील नाल्‍यातील आजपर्यंत काढण्‍यात आलेल्‍या गाळाची माहिती व रोजच्‍या रोज काढण्‍यात येणाऱया गाळाची माहिती येत्‍या 10 जुन पर्यंत सोशल मिडियाच्‍या माध्‍यमातून मुंबईकरांना देण्‍यात यावी. तसेच संब‍धित कंत्राटदार, साईट इंजिनिअर यांचे नंबर जाहीर करण्‍यात यावेत अशी मागणी करीत मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी गुरुवारी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस याची भेट घेतली. मुख्‍यमंत्र्यांनी याबाबत तात्‍काळ कार्यवाही करण्‍याचे निर्देश पालिका प्रशासनाला दिेले आहेत.

मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी भाजपा नगरसेवकांसह नालेसफाईचा दुसर्या टप्‍प्‍यातील पाहणी दौरा काल केल्‍यानंतर चिंताजनक बाबी समोर आल्‍या होत्‍या. त्‍यामुळे आज याप्रकरणी त्‍यांनी मंत्रालयात मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मान्‍सून पुर्व कामे ज्‍या पध्‍दतीने मुंबईत सुरू आहेत त्‍याबाबत भाजपा असमाधानी असून या कामांमध्‍ये पारदर्शकता यावी आणि कामांना अधिक वेग यावा म्‍हणून मुख्‍यमंत्र्यांना पालिका आयुक्‍तांनी निर्देश द्यावेत अशी मागणीचे पत्र घेऊन आमदार आशिष शेलार यानी ही भेट घेतली.मुख्‍यमंत्र्यांना दिलेल्‍या या पत्रामध्‍ये त्‍यांनी नालेसफाईच्‍या कामांना व रस्‍ता दुरूस्‍तीच्‍या कामांना वेग देण्‍याचे निर्देश पालिका प्रशासनाला द्यावेत, नालेसफाईच्‍या कामांवर सिसिटीव्‍हीद्वारे लक्ष रहावे, गाळ मोजण्‍यात येणा-या वजन काटयांच्‍या पावत्‍यांची पालिका प्रशासनाने वेळीच पारदर्शी पध्‍दतीने तपासणी करावी, नाल्‍यातील गाळ काढणे, त्‍याची वाहतुक व डंम्पिंग ग्राऊंड यावर वेळीच नियंत्रण रहावे म्‍हणून आवश्‍यक असल्‍यास स्‍वतंत्र गस्‍त पथक नियुक्‍त करून त्‍यावर लक्ष ठेवण्‍यात यावे, मान्‍सून पुर्व कामे युध्‍द पातळीवर व्‍हावीत म्‍हणून या कामांची बाबदारी आवश्‍यकता असल्‍यास एका अतिरिक्‍त्‍ आयुक्‍तांकडे देऊन त्‍यांची जबाबदारी निश्चित करण्‍यात यावी, नालेसफाई सोबतच आपत्कालीन कक्षाची सुसज्‍जता, वृक्ष छाटणी, धोकादायक इमारती, दरडीवरील झोपडपट्या यासर्वच कामांनाही प्राधान्‍य क्रम देण्‍यात यावा, महापालिकेच्‍याकामांसोबतच पालिकेने मुंबईतील रेल्‍वे, मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए, म्‍हाडा व अन्‍य संबंधित प्रशासकीय यंत्रणांच्‍या अधिका-यांयांशी समन्‍वय साधावा, ज्‍या कंत्राटदारांवर भ्रष्‍टाचारांची चौकशी सुरू आहे त्‍यामध्‍ये शिथिलता न येता चौकशी व त्‍यापुढील कार्यवाही वेगाने करण्‍याबाबत तपास यंत्रणांना सुचना देण्‍यात याव्‍यात, नालेसफाईच्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी कंत्राटदार, साईट इंजिनीअर यांचे मोबाईल नंबर व त्यांनी आतापर्यंत केलेले काम हे सोशल नेटवर्क, फेसबुक, ट्वीटर या मार्फत जनतेसाठी जाहीर करावे.

तसेच उद्यापासून ते १० जून पर्यंत नालेसफाईचे रोजचे काम, टक्केवारीसह दररोज सायंकाळी ७ वाजता महानगरपालिकेने त्यांच्या फेसबुक, ट्वीटर वर फोटोसह जाहीर करावे व महानगरपालिके मार्फत दरवर्षी पूर नियंत्रणासाठी करण्यात येणा-या उपयोजना यांच्या आयटी मुंबई निरी आणि आर्मी कॉर्प ऑफ इंजिनीअर यांच्या मार्फत एका महिन्यात ऑडीट करण्यात यावे तसेच बनविण्यात यावा. आपत्कालीन पूर परिस्थितीमध्ये कोणत्या उपयोजना करण्यात याव्यात याची बनविण्यात यावी. याकरिता आर्मी कॉर्प ऑफ इंजिनीअर आणि नॅशनल डिझास्टर रीस्पोस्न फोर्स यांची मदत घेऊन सदर एका महिन्यात जाहीर करावा.तसेच वारंवार मुंबईतील रस्ते, खड्डे, नालेसफाई यावर हजारो कोटींचा खर्च होत आहे. परंतु अद्याप समाधानकारक काम होत नाही आणि मुंबईकरांकडून नेहमीच निकृष्टदर्जाच्या कामाबाबत तक्रारी येत असतात. याकरिता राज्य शासन व प्रमुख कंपन्यांना घेऊन एमएसआरडीसी च्या धर्तीवर ५०-५० तत्वावर व ५ टक्के नफ्यावर एक प्राधिकरण बनवून त्यांच्या मार्फत हे काम करण्यात यावे जेणेकरून निकृष्ट दर्जाचे काम करणा-या कंत्राटदर माफियांना आळा बसेल.
अशा मागण्‍या केल्‍या होत्‍या. दरम्‍यान, त्‍या पत्रावर मख्‍यमंत्र्यांनी या प्रकरणी तात्‍काळ कार्यवाही करावी असे निर्देश पालिका आयुक्‍ताना दिले आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget