फॅशन स्ट्रीटवरील स्टॉल्सधारकांना महापालिकेची २४ तासांची मुदत - मंगळवार पासून कारवाई


मुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) – मुंबईमध्ये नाव नव्या फॅशनचे कपडे आणि इतर सामान हमखास मिळणार अशी जागा म्हणजे चर्चगेटजवळील फॅशन स्ट्रीट. या फॅशन स्ट्रीटवर आपला व्यवसाय करण्यासाठी महापालिकेने ठरवून दिलेल्या जागेत व्यवसाय न करता, सर्रासपणे रस्त्यात गारमेंटची विक्री करण्यात येते. अश्या ३९४ पैकी ४९ बेकायदा आणि अतिक्रमण करणा-या स्टॉल्सधारकांना आज सोमवारी पोलिसांसह कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. या नोटीसीनुसार स्टॉलधारकांना २४ तासांची मुदत देण्यात आली असून मंगळवार पासून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.

फॅशन स्ट्रीटवरील ३९४ स्टॉलधारक नियमांचे उल्लन्घन करतात म्हणून महापालिकेने या विभागाची पाहणी केली होती. त्यापैकी ४९ स्टॉलधारकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे समोर आले. या ४९ स्टॉल धारकांचे शुक्रवारी १९ मे ला येथील ‘लायसन्स’ ए विभागाने रद्द केले आहे. त्यानंतर त्यांना २४ तासांत रस्त्यावरील संपूर्ण लाकडी सामान हटवून पदपथ मोकळे करण्याच्या लेखी सूचना देऊनही, शनिवारी सामान न हटवल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार होती. शनिवारी पालिकेच्या "ए" विभागाचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी येथे कारवाई करण्यासाठी गेले असता, अनेक व्यापाऱ्यांनी बराच वेळ गोंधळ घालत कारवाई करु न दिल्याने पालिकेच्या पथकाला हात हलवत परतावे लागले होते. अतिक्रमण केलेल्या येथील ४९ व्यावसायिकांना २० जानेवारी २०१७ रोजी नोटीस दिल्यानंतरसुद्धा त्यांनी त्याची दखल घेतली नाही. २३ जानेवारी २०१७ रोजी पालिकेच्या अनुज्ञापन विभागाच्या अधिका-यांनी फॅशन स्ट्रीटची तपासणी केली असता, दुकानदारांनी काहीच सामान हटवले नसल्याचे निदर्शनास आले, अशी माहिती पालिकेच्या "ए" विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. अखेरीस शनिवारी परवाना विभागाने त्यांचे सामान जप्त करण्याचा निर्णय घेतला. अधिकारी व कर्मचारी तेथे पोहचले असता स्टॉल्सधारकांनी त्यांना गराडा घालून तसेच बराचवेळ गोंधळ - आरडाओरड करुन कारवाई करुच दिली नाही. यामुळे सोमवारी पोलिसांची मदत घेऊन कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र सोमवारीही पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना या स्टॉल धारकांवर कारवाई करता आलेली नाही. सोमवारी या स्टॉलधारकांना पालिकेने कारणे दाखवा नोटीस दिली असून २४ तासांची मुदत दिली आहे. या २४ तासांत स्टॉलधारकांनी आपले सामान न हटवल्यास मंगळवारपासून पालिकेच्या पथकाकडून या स्टॉल धारकांवर पोलीस बळाचा वापर करत कारवाई केली जाणार आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget