मनसेच्या दणक्याने पालिका प्रशासनाला आली जाग - ठरावांच्या सूचनांवरील अभिप्राय मिळणार वेळेत

मुंबई शुक्रवार (प्रतिनिधी)- मुंबई पालिकेतील नगरसेवकांच्या महत्वाच्या ठरावांच्या सूचनांवर पालिका प्रशासनाकडून अभिप्राय न देता वेळकाढू धोरण अवलंबले जाते गेली दहा दहा वषॅ अभिप्राय मिळत नव्हता परिणामी महत्वाचे मुद्दे निकाली निघत नाहीत. याबाबत मनसेने आवाज उठविल्यानंतर प्रशासनाने २७ पैकी २० ठरावांच्या सुचनांवर येत्या आठ दिवसात अभिप्राय देण्याची कबूली दिली आहे.

मुंबई पालिकेत 227 नगरसेवक आहेत हे नगरसेवक लोकांच्या समस्या पश्न पालिका सभागृहात मांडत असतात पालिका सभागृहात मंजूर झालेल्या ठरावाच्या सुचना अभिप्रायसाठी पालिका आयुक्त यांच्याकडे पाठवल्या जातात मात्र पालिका प्रशासनाकडून गेली दहा दहा वषॅ आयुक्त यांच्या कडून अभिप्राय येत नाही त्यामुळे नगरसेवकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली होती मात्र या नगरसेवकांची नाराजी दूर होणार आहे मनसेच्या दणक्याने पालिका आता जागी झाली आहे मुंबईतील हुतात्मा चाफेकर बंधूंचे शिल्प उभारण्याबाबतच्या ठरावाच्या सूचनेवर प्रशासनाने चाफेकर बंधूंच्या देशकार्याचा इतिहास मिळत नाही, असे कारण पुढे केले होते. याबाबत मनसेचे पालिका गटनेते दिलीप मामा लांडे यांनी विधी समितीच्या बैठकीत हरकत घेतली. मुंबईच्या दृष्टीकोनातून एकूण २३६ ठरावांच्या सूचनांचे अभिप्राय अद्यापपर्यंत कार्यवाहीविना पडून आहेत. यामध्ये महाराष्ट्र भवन बांधणे, खाजगी सोसायट्यांमध्ये गांडूळ प्रकल्प राबविणे बंधनकारक करणे, पालिका रुग्णालयांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या डॉक्टरांना पुरस्काराने गौरविणे, शिक्षण खात्यामार्फत सादर होणाऱ्या बालकोत्सवास बाळासाहेब ठाकरे ह्यांचे नाव देणे, स्वच्छतेचे महानकार्य करणाऱ्या संस्था- शाळांना संत गाडगेबाबा चषक देणे, पालिका शाळांमध्ये इयत्ता ९ वी आणि १० वीचे वर्ग सुरु करणे, प्रत्येक पालिका रुग्णालयात मोफत रुग्णवाहिका सेवा पुरविणे, खाजगी इमारतींमध्ये नगरसेवकांच्या माध्यमातून नागरी सुविधा पुरविणे इत्यादी महत्वाच्या ठरावांच्या सूचनांवर प्रशासनाकडून वेळीच अभिप्राय मिळत नसल्याचे सांगत विशेष बैठक बोलावण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार गुरुवारी झालेल्या विशेष विधी समितीच्या बैठकीत २७ पैकी सात ठरावांच्या सूचनांचे अभिप्राय दिले. तसेच उर्वरित २० सूचनांवर येत्या आठ दिवसात अभिप्राय देण्याची कबूली पालिका प्रशासनाने दिली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget