मुंबईत दर आठवड्याला 154 दुघॅटना

एका महिन्यात 706 दुघॅटना
आठ जखमी 33 जखमी
दररोज सरासरी 22 दुघॅटना
मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून या मुंबापुरीत सुमारे दिड कोटी जनता राहत आहे या 24 तास गजबजलेल्या शहरात लोकसंख्ये बरोबर वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असताना दुर्घटना मोठ्या प्रमाणात होत आहेत या दुघॅटनांमध्ये आग लागणे , घराची पडझड , वाहन अपघात , समुद्रात पडून मृत्यू होणे , आदिंसारख्या दुघॅटनांतही प्रचंड वाढ होत आहे दर आठवड्याला सरासरी 154 दुघॅटना होत असल्याअसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे

मुंबई पालिका अग्निशमन दलाने एक ते 31 जानेवारी 2017 या महिन्यातील दुघॅटनांचा अहवाल दिला असून त्याचे निरीक्षण केल्यास एका महिन्यात विविध प्रकारच्या 706 दुघॅटना घडून त्यामध्ये 33 जन जखमी आणि 8 जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे मुंबईत दर आठवड्याला सरासरी 154 दुघॅटना घडत आहेत व त्यामध्ये दोन मृत्यू तर 8 जण जखमी झाले आहेत त्या प्रमाणे या अहवालानुसार 24 तासात सरासरी 22 -23 दुघॅटना घडून एक जण जखमी होत आहे असे अहवालानुसार पष्ट होत आहे 1 ते 15 जानेवारी या कालावधीत आग लागने , नाल्यात पडणे , वाहन अपघात , समुद्रात बुडणे , घराची , भिंतीची पडझड , अशा र-वरुपाच्या 312 दुघॅटना घडल्या आहेत त्यामध्ये 16 जण जखमी झाले तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे त्यामध्ये 15 पुरुष व एक महिला जखमी झाले आहेत तर तीन पुरुष मृत्यू झाले आहेत या तीन पैकी एकाचा समुद्रात बुडून तर दुस-याचा नाल्यात पडून आणि तिसर्‍याचा घरात पडून दुदैवी मृत्यू झाला आहे तसेच 15 ते 31 जानेवारी या कालावधीत 394 दुघॅटना घडल्या आहेत त्यामध्ये 17 जण जखमी तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे या पाच पैकी एकाचा घरात मृत्यू झाला असून दुसऱ्याने आत्महत्या केली आहे तर उर्वरित तिघांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे एका महिन्यातील 706 दुघॅटनांची आकडेवारी पाहता मुंबईकरांसाठी चिंताजनक बाब झाली आहे
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget