नाले सफाईच्या कामाबाबत आम्ही 100 टक्के असमाधानी

कालचा दौरा कंत्राटदारांना क्लिनचिट देण्यासाठी -
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांचे पाहणी दौऱ्यानंतर मत -
पश्चिम उपनगरातील दुसऱ्या टप्प्यातील आज नालेसफाईचा पाहणी दौरा -
मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – मुंबईत नालेसफाईची जी कामे सुरू आहेत त्याबाबत 100 टक्के आम्ही असमाधानी आहोत. अजुनही महापालिका प्रशासनाने नाल्यातील गाळ नेमका किती काढला जातो? कुठे टाकला जातो? याबाबत लक्ष देण्य़ाची गरज आहे. असे मत व्यक्त करत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी आजच्या पाहणी दौऱ्यादरम्यान कंत्राटदाराकडे असलेल्या बोगस पावत्या उघड केल्या. तर कालचा दौरा हा गतवर्षीच्या भ्रष्ट कंत्राटदारांना क्लिनचिट देण्यासाठी होता अशी टीका केली आहे.

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्यासह भाजपच्या नगरसेवकांनी आज पश्चिम उपनगरातील दुसऱ्या टप्प्यातील नालेसफाईचा पाहणी दौरा केला. या दौऱ्यात आमदार भारती लव्हेकर, पालिका गटनेते मनोज कोटक, नगरसेविका अलका केरकर, अभिजीत सामंत, राजेश्री शिरवडकर, मुजरी पटेल आणि अन्य भाजप नगरसेवक, पदाधिकारी सहभागी झाले होते. सुरूवातीला मरोळ येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील लेलेवाडी आणि कृष्णा नाल्याची पाहणी करण्यात आली. या नाल्यातील गाळ कुठे टाकला जातो, याबाबत विचारणा केल्यानंतर कंत्राटदाराने विविध पावत्या सादर केल्या. मात्र एकाच दिवशी मिरा-भाईंदर येथील वजनकाट्यावर वजन केलेल्या पावत्यांमध्ये तफावत असल्याचे उघड झाले. यामध्ये काही पावत्यांवर वजन करणाऱ्याची सही, सुपरवायझरची सही दिसून आली नाही. त्यानंतर अंधेरी पूर्व, साकीनाका याभागातील मोगरा, ओशिवरा नदी यासह वर्सोवा येथील डंम्पींग ग्राऊंडचीही पाहणी केली. लेलेवाडी येथील नाल्यामध्ये आज पोकलेन मशीन आज उतरवण्यात आल्या आहेत तर कृष्णा नाल्यामध्ये उतरवलेले मशीन उलटले होते ते आज सरळ करण्यात आले आहे, त्यामुळे काम प्रत्यक्ष खोळंबलेली असल्याचे पाहायला मिळाले.

यापुर्वी हे कंत्राटदार नालेसफाईची कामे करत होते त्यांनी या वेळी रॅकेट करून, मुंबईकरांना वेठीस धरून काम न करण्याचे ठरवले आणि प्रशासनाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र ही कोंडी फोडून प्रशासनाने ज्या पद्धतीने कामाला सुरूवात केली आहे त्याबद्दल प्रशासनाचे अभिनंदन करतो. मात्र जी कामे सुरू आहेत ती पाहिल्यावर 100 टक्के समाधान व्यक्त करावे अशी परिस्थीती नक्की नाही. आम्ही कामांबाबत 100 टक्के असमाधानी आहोत. ज्या गोष्टींची भिती वाटत होती त्याच गोष्टी पुन्हा दुर्दैवाने घडत आहेत. ज्या नाल्यातून गाळ काढला जातो आहे. तो गाळ मिरा-भाईंदर येथील वजनकाट्यावर वजन केला जातो आहे. आणि वर्सोवा येथील खाजगी डंम्पींग ग्राऊंडवर टाकला जातो आहे या सगळ्याच्या कागदपत्रांमध्ये आजही तफावत दिसून येते आहे. आजही बोगस पावत्या सापडल्या. त्यामुळे याबाबत प्रशासनाने अजुनही गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे. ही सुचना मी आजही करतो आणि 28 एप्रिलला एसएनडीटी, नॉर्थ एव्हेन्यू , मेन एव्हेन्यू आणि त्या परिसरातल्या नाल्यांची पाहणी केली होती त्यावेळी देखील ही सुचना केली होती, असे सांगत आमदार आशिष शेलार यांनी आजच्या दौऱ्यातही पुन्हा कंत्राटदारांच्या बोगस पावत्या दाखवत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निवडणूकीमध्ये जे बोलतो ते करून दाखवतो अशा घोषणा यांनी केल्या होत्या, ते आता 100 टक्के होऊ शकत नाही असे म्हणू लागले आहेत. जबाबदारीच्या पदावर असणाऱ्यांना असे हात झटकता येणार नाहीत. आणि भाजप पारदर्शकतेचे पहारेकरी असून हे भाजप कधीही मान्य करणार नाही असेही आमदार आशिष शेलार यांनी स्पष्ट केले. ज्या कंत्राटदारांवर गतवर्षी भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यांची चौकशी सुरू आहे आणि एफआयार सुद्धा दाखल झालेल्या आहेत. अशा कंत्राटदारांना क्लिनचिट देण्यासाठी तर हा कालचा पाहणी दौरा नव्हता ना! असा खोचक सवाल करीत आमदार आशिष शेलार यांनी गतवर्षी मुंबईकरांची “अवस्था काटा रूते कुणाला...” अशी होती तर यावर्षी “काटा लगा...” अशी आहे असा टोलाही मारला
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget