पालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी मोफत क्रिकेट प्रशिक्षण शिबिर

मुंबई शनिवार ( प्रतिनिधी ) –   पालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी दिड महिन्याचे मोफत क्रिकेट प्रशिक्षण शिबीर नॅशनल क्रिकेट क्‍लब आणि रूट मोबाईल कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. या दिड महिन्याच्या शिबीरातून १४ वर्षाखीलील २० मुले आणि १६ वर्षाखालील २० मुले प्रशिक्षकांमार्फत निवडली जाणार असून या दोन्ही वयोगटातील मिळून ४० मुलांना वर्षभर नॅशनल क्रिकेट क्‍लब च्या माध्यमातून मोफत क्रिकेट प्रशिक्षण दिले जाणार आहे.

गल्लीबोळात खेळणाऱ्या, झोपडपट्टीत राहणाऱ्या आणि पालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनेक मुलांमध्ये क्रिकेट खेळण्याबाबत टॅलेंट असूनही आर्थिक क्षमता नसल्याने आणि क्रकेट या खेळाचे प्रशिक्षण न मिळाल्यामुळे ही मुले मागे राहतात. याच गोष्टीचा विचार करून नॅशनल क्रिकेट क्लब आणि रूट मोबाईल कंपनीने यावर्षी दि.   १९ ते २१ एप्रिल असे तीन दिवस खेळाडूंची निवड केली जाणार असून त्यानंतर दिड महिना म्हणजेच २५ मे पर्यंत  क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन  करण्यात आले आहे. या शिबिरात  निवड झालेल्या ४० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन बिसिसिआयच्या इनडोअर क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळण्याची संघी दिली जाणार आहे. मुंबई क्रिकेट क्लबचे कोच शेखर भोर, नॅशनल क्रिकेट क्लबचे कॅप्टन प्रसाद मांजरेकर, तसेच इतर अनुभवी प्रशिक्षकांमार्फत निवड झालेल्या खेळाडूंना  क्रिकेट प्रशिक्षण देण्यात येणार आहे. क्रॉस मैदान या शासकिय मैदानावर या मुलांना क्रिकेट प्रशिक्षण देण्यात येणार असून शासनानेही या उपक्रमाला प्रोत्‍साहन दिले आहे. अधिक माहितीसाठी जितेंद्र कनोजिया (८४३३३०००७४)येथे संपर्क साधावा असे आवाहन आयो‍जकांमार्फत म्हणजेच नॅशनल क्रिकेट क्‍लब आणि रूट मोबाईल कंपनी यांनी  केले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget