शेतक-यांना कर्जमाफी देण्याचे निर्देश सरकारला द्या

मुंबई रविवार ( प्रतिनिधी ) – राज्यातील शेतक-यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी कर्जमाफी देण्याचे निर्देश सरकारला द्यावेत व राज्यपालांच्या अभिभाषणात कर्जमाफी बाबत घोषणा व्हावी या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉग्रेस- काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल सी विद्यासागर राव यांची भेट घेतली.

या शिष्टमंडळात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे , माजी मुख्यमंत्री नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण, शेकापचे गणपतराव देशमुख, आ. शरद रणपिसे, कपिल पाटील, संजय दत्त, भाई जगताप, डी.पी. सावंत आदी उपस्थित होते.यावेळी नेत्यांनी राज्यातील शेतक-यांची बिकट अवस्था आणि त्यांना दिलासा देण्यासाठी व आत्महत्या रोखण्याची आवश्यकता या कडे महामहीम राज्यपालांचे लक्ष वेधले.

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget