उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना

मुंबई ( प्रतिनिधी ) – भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार सन २०१७ च्या उन्हाळ्यात राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक असणार आहे. उष्णतेच्या लाटेमुळे कोणत्याही प्रकारची जिवीतहानी होऊ नये याकरीता याबाबतच्या उपाययोजना करण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, महाराष्ट्र सरकरमार्फत देण्यात आलेले आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाच्या खबरदारीसाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत-जास्त पाणी प्यावे. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री/ टोपी, बुट व चपलांचा वापर करावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी. उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तिंनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा तसेच ओल्या कपडय़ांनी डोके, मान व चेहरा झाकावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा नियमितपणे वापर करावा. अशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

गुरांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या उघडय़ा ठेवाव्यात. पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करण्यात यावे. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा. बाहेर कामकाज करीत असताना मध्ये-मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करण्यात यावा. गरोदर महिला कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी. रस्त्याच्याकडेला उन्हापासून संरक्षणाकरीता शेड उभाराव्यात तसेच जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी.

लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये. दुपारी १२.०० ते ३.३० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत, दुपारी १२.०० ते ३.३० या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडय़ा ठेवाव्यात. तरी नागरिकांनी सर्व सुचनांचे पालन करावे, असे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget