पालिका मुख्यालयसमोर विजयाचा भगवा जल्लोष


सनईच्या सूर आणि फटाक्यांची आतषबाजीने परिसर दुमदुमला मुंबई, बुधवार (प्रतिनिधी)- सोन्याची अंडी देणा-या मुंबई पालिकेवर तब्बल २१ वर्षानंतर पालिका निवडणुकीच्या इतिहासात शिवसेनेने स्वबळावर महापौर व उपमहापौर निवडून आल्याने पालिका सभागृह आणि मुख्यालय परिसरात ढोल, ताशांच्या गजरात शिवसैनिकांनी जोरदार जल्लोष केला. सकाळपासूनच भगवे झेंडे व विजयाचे फलक आणि भगव्या रंगाचे कपडे व फेटे बांधून सैनिक रस्त्यावर उतरले होते. यामुळे फोर्ट परिसरात भगवी झळाली दिसून आली. त्यातच विजयाच्या घोषणा, सनई चौघड्यांचा सूर आणि फटाक्यांच्या आतिषबाजांनी संपूर्ण परिसर दणाणूण गेला होता.

देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणाऱ्या पालिका निवडणुकीत शिवसेना -भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली. यात शिवसेनेला ८४+४ अपक्ष मिळून ८८ संख्याबळ एक नंबरचा पक्ष ठरला. भाजपने या निवडणुकीतून माघार घेतल्याने महापौर पदाची निवडणूक जिंकणे शिवसेनेला सोपी झाली. त्यामुळे महापौर व उपमहापौर शिवसेनेचाच होणार हे अपेक्षित असल्याने शिवसेनेने विजयाच्या जल्लोषाची जोरदार तयारी केली होती. सकाळपासूनच पालिका मुख्यालयासमोरचा परिसर भगव्या फलक आणि झेंड्यांनी सजला होता. सीएसटीपासून मेट्रो सिनेमापर्यंत प्रत्येक ठिकाणी भगवेमय वातावरणाचा मुंबईकरांना सकाळपासून दर्शन झाले. पालिका कार्यालयाच्या गेट क्रमांक 3 च्या समोरचा भगव्या झेंड्यांनी सजलेला रस्ता, भव्य स्टेज, हत्तीच्या प्रतीकृती येणाऱ्या- जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. बरोबर १२ वाजता पालिका मुख्यालयाच्या सभागृहात निवडणुकीला सुरुवात होणार असल्याने काही वेळ आधीच मुख्यालयासमोर शिवसैनिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. परिसरात कडेकोट बंदोबस्त असल्याने आझाद मैदानासमोर बघ्यांची गर्दी झाली होती. परिसरातले भगवे वातावरण, जल्लोष अनेकांनी आपल्या मोबाईल कॅम-यात टिपले. १२ वाजायला काही मिनीटे शिल्लक असताना भगवे फेटे घातलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचे आगमन होताच उपस्थित शिवसैनिकांनी जोरदार जल्लोषात त्यांचे स्वागत केले. सनईच्या सूरात भारावलेल्या वातावरणात नगरसेवकांनी हात उंचावले तसा विजयाच्या घोषणांचा जोर वाढत राहीला. शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी भगवे फेटे परिधान करून पालिका मुख्यालयात प्रवेश केला. पहिल्या मजल्यावरील सभागृहात महापौर व उपमहापौर पदासाठीच्या होणा-या निवडणुकीसाठी सर्व नगरसेवक घोषणा देत आसनस्थ झाले. दुपारी १२ वाजता निवडणूक सुरू झाली, व काही वेळानंतर अपेक्षेप्रमाणे महापौर शिवसेनेचाच निवडून आल्याची घोषणा झाल्यावर परिसरात फटाक्यांची जोरदार आतषबाजी झाली. त्यानंतर उपमहापौरही शिवसेनेचाच झाल्याने विजय द्वीगुणीत झाला होता. सकाळपासून ते निवडणूक पार पडेपर्यंत शिवसैनिकांची गर्दी वाढू लागली. त्याच उत्साहात अन तोच जल्लोष संपूर्ण दिवसभर मुंबईकरांना पहायला मिळाला. संध्याकाळी कार्यालयातून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचेही पाय या जल्लोषाच्या दिशेने थबकताना दिसले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget