पालिका रूग्णालयात होणारी तांदूळ -गव्हाची वाहतूक एकदम निकृष्ट दर्जाची

मुंबई शनिवार ( प्रतिनिधी ) – देशात सर्वात मोठी पालिका आणि सोन्याची अंडी देणा-या मुंबई पालिकेच्या रुग्णालयात तांदूळ -गव्हाची वाहतूक चक्क निकृष्ट दर्जाची होते. पालिकेच्या अर्थसंकल्पात कोट्यवधी रुपयाची तरतूद होत असतानाही रुग्णांना मात्र चांगले जेवण मिळत नाही असा सणसणीत आरोप नगरसेवकांनी केला. तांदूळ -गव्हाची वाहतूक करण्याच्या प्रस्तावात कोणत्या दर्जाचा गहू -तांदऴाचा पुरवठा होणार आहे. त्याचे नाव काय याबाबत प्रशासनाला सविस्तर उत्तर देता न आल्याने हा प्रस्ताव मंजूर न करता परत पालिका प्रशासनाकडे पाठवण्यात आला.

मुंबई पालिका 11 रुग्णालयात रूग्णांना जेवणासाठी गहू -तांदळाचा पुरवठा करण्याबाबतचा प्रस्ताव पालिका र-थायी समितीत चर्चेला आला असता हा पुरवठा निकृष्ट दर्जाचा होतो. रूग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण मिळते याबाबत रूग्णांच्या नातेवाईकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत पालिका शीव येथील लोकमान्य टिळख रूग्णालयात निकृष्ट दर्जाचे जेवण मिळते. तेथे तक्रार नाही, असा आरोप काँग्रेसचे गटनेते रवी राजा यांनी स्थायी समितीत केला. तक्रारवही ठेवून त्याची दर तीन महिन्याला तपासणी करावी अशीही त्यांनी मागणी केली. शिवसेनेच्या नगरसेविका शुभदा गुडेकर यांनी प्रस्तावात कोणत्या प्रकारच्या गहू - तांदऴाची वाहतूक केली जाणार आहे याचा उल्लेख नाही, त्याचा दर्जा, नाव नमूद असायला हवे, याकडे लक्ष वेधले. रुग्णालयात मिळणा-या निकृष्ट जेवणाबाबत संताप व्यक्त करीत हा प्रस्ताव सविस्तर आणावा असे मागणीही लावून धरली. सविस्तर प्रस्ताव आणेपर्यंत प्रस्ताव दप्तरी दाखल करावा अशी मागणी केली. भाजपच्या सदस्यांनीही हा मुद्दा लावून धरला. प्रशासनाला गहू - तांदळाच्या दर्जाबाबत नीट उत्तर देता आले नाही. त्यामुळे प्रस्ताव परत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget