कचरा व्यवस्थापनासाठी सरसावली नायगांव पोलिस कॉलनी

मुंबई मंगळवार ( प्रतिनिधी ) – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात गंभीर होत आहे. त्यामुळे घनकचऱ्याचे व्यवस्थापन होणे ही काळाची मोठी गरज आहे. त्यासाठी आता मुंबई पोलिस आयुक्‍तालयाने पुढाकार घेतला असून मुंबई परिसरातील पोलिस कुटुंबियांच्या कॉलनीतील ओला आणि सुका कचऱ्याचे कॉलनी परिसरातच व्यवस्थापन करण्याचा संकल्प सोडला आहे. या योजनेचा भाग म्हणून नायगांव येथील पोलिस कॉलनीतील कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे मुंबई पोलिस आयुक्‍त दत्ता पडसाळगीकर हस्ते उदघाटन करण्यात आले आहे

घनकचऱ्याचे निर्मितीच्या ठिकाणीच व्यवस्थापन झाल्यास मुंबईतील कचरा निर्मूलन शक्‍य आहे. सोसायटी तसेच कॉलनी परिसरातील घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात माहिती झाल्यानंतर मुंबईचे पोलिस आयुक्‍त दत्ता पडसाळगीकर यांनी मुंबईतील पोलिस कॉलनीमध्ये अशा प्रकारचे प्रकल्प उभे करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार मुंबईतील नायगांव येथील पोलिस कॉलनीमध्ये मुंबई पोलिस आयुक्‍त आणि राजश्री एन्व्हायरो सोल्युशन कंपनीच्या संयुक्‍त विद्यमाने घनकचरा प्रकल्प साकारला आहे. नुकतेच या प्रकल्पाचे उदघाटन पोलिस आयुक्‍त पडसाळगीकर, सहाय्यक पोलिस आयुक्‍त अनुपकुमार सिंह, अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त अस्वती डोरजे , आमदार कालिदास कोळंबकर, स्थानिक नगरसेवक संजय मोरे, राजश्री एन्व्हायरो सोल्युशनचे विक्रम वैदय आदी यावेळी उपस्थित होते.

पोलीस कॉलनी होणार कचरा मुक्तया प्रकल्पाच्या माध्यमातुन नायगांव पोलिस कॉलनीतील दररोजचा अडीच हजारहून अधिक घरातील तसेच पोलिस कॅन्टीनमधील ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन कॉलनी परिसरात तयार केलेल्या घनकचरा व्यवस्थापन केंद्रात करण्यात येत आहे. रोजच्या येणाऱ्या कचरयापासून उत्तम दर्जाचे सेंद्रीय खत दहा दिवसात तयार करण्याचे यंत्र या प्रकल्पात बसविण्यात आले आहे. तसेच सुका कचरा देखील तानाजी घाग यांच्या संगम संस्थेच्या सहकार्याने पुर्नप्रक्रियेसाठी पाठविला जाणार असल्याने नायगांव पोलिस कॉलनी आता कचरा मुक्‍त होणार आहे. यावेळीत पोलिस कॉलनीतील सर्व घरासाठी ओला कचरा आणि सुका कचरासाठी वेगवेगळया कचरयाच्या बकेटचे देखील वाटप करण्यात आले. असा प्रकल्प मुंबईतील इतरही पोलिस कॉलनीत राबविणार असल्याची माहिती पोलिस आयुक्‍त पडसाळगीकर यांनी दिली.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget