ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ कृष्णा किरवले यांच्या हत्येच्या निषेधार्थ आरपीआयचे सोमवारी आझाद मैदानात आंदोलन

मुंबई रविवार ( प्रतिनिधी ) – ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत साहित्यिक डॉ कृष्णा किरवले यांच्या कोल्हापुरात झालेल्या हत्येचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार उद्या सोमवार दि 6 मार्च रोजी दुपारी 2 वाजता मुंबईत आझाद मैदान येथे रिपाइं च्या वतीने डॉ कृष्णा किरवले हत्येच्या निषेधार्थ तीव्र धरणे निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती रिपाइं तर्फे देण्यात आली आहे .

डॉ कृष्णा किरवले यांच्यावरील हल्ला हा पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीवरील हल्ला आहे . आंबेडकरी विचारवंतांच्या हत्येने आंबेडकरी विचार संपू शकत नाही विचारवंतांची हत्या होणे ही महाराष्ट्राच्या सामाजिक लौकिकाला काळिमा फासणारी घटना आहे या चा रिपाइं तर्फे तीव्र निषेध करण्यासाठी तसेच डॉ कृष्णा किरवले यांच्या हत्येची सीबीआय तर्फे चौकशी व्हावी आणि मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा करावी या मागणी साठी रिपब्लिकन पक्षातर्फे मुंबईत उद्या आझाद मैदानात तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे या आंदोलनात मुंबईतील सर्व रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रिपाइं (आठवले ) तर्फे करण्यात आले आहे
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget