शिवसेनेचे नविन होणारे महापौर विश्वनाथ महाडेश्वर अडचणीत

मुंबई, सोमवार (प्रतिनिधी) - मुंबई पालिका महापौर निवडणूक अध्याप न होताच आणि महापौरपदावर निवड होण्यापूर्वीच शिवसेनेचे महापौरपदाचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर अडचणीत सापडले आहेत त्यांच्यावर नियमांचा भंग करुन महापालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमधील सदनिका विकत घेतल्याचा आरोप वॉर्ड क्र. 87 चे अपक्ष उमेदवार महेंद्र पवार यांनी केला आहे.
विश्वनाथ महाडेश्वर राहत असलेल्या साईप्रसाद गृहनिर्माण संस्था या इमारतीत राहतात. हे घर महापालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे असून त्यांनी ही सदनिका विकत घेतली आहे. ही सदनिका त्यांनी नियमाबाह्य रितीनं विकत घेतली असून निवडणूक आयोगाला यासंर्दभात त्यांनी चूकीची माहिती दिल्याचे पवार यांचे म्हणणे आहे. याविरोधात पवार यांनी महाडेश्वर यांच्याविरोधात तक्रारही दाखल केली होती. उच्च न्यायालयाने हे प्रकरण लघूवाद न्यायालयात दाखल करण्यास सांगितले. यावर येत्या 23 फेब्रवारीला सुनावणीस होणार आहे. तोपर्यंत तरी महाडेश्वरांना महापौर बनवू नये, अशी मागणी पवार यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांना लेखी स्वरूपात केली केली आहे.

नियमांचं भंग केल्याचा आरोप चुकीचा आहे. निवडणूक आयोगाला शपथपत्रात याबाबत सर्व माहिती दिली आहे, असं स्पष्टीकरण विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिलं आहे. शिवाय, “मी आता ज्या घरात राहतो आहे, ते घर माझं स्वत:चं नाही. शपथपत्रात तसं स्पष्ट लिहिले आहे. गजानन पंडित यांच्या नावे हे घर असून, मी भाड्याने इथे राहतो. तसा मूळ मालकाशी करारही केला आहे.”, असेही विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget