होळी’ च्या कालावधीत कोणत्याही प्रकाराची वृक्षतोड करु नये

अनधिकृत वृक्षतोड करणाऱयांना दंड तसेच कैदेची शिक्षा
मुंबई मंगळवार ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, १९७५ च्या तरतुदीनुसार वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतेही झाड तोडण्यास कारणीभूत होणे हा कलम २१ अन्वये अपराध असून, अनधिकृत वृक्षतोड करणाऱयास प्रत्येक गुन्ह्यासाठी कमीत कमी रुपये १,०००/- पासून रुपये ५,०००/- पर्यंत दंड तसेच एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षा होऊ शकते. अनधिकृत वृक्षतोड करणे हा गुन्हा आहे. तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, ‘होळी’ च्या कालावधीत कोणत्याही प्रकाराची वृक्षतोड करु नये. सतर्क नागरिकांनी वृक्षतोड होत असल्याचे आढळल्यास,पालिका अधिकाऱयांस व स्थानिक पोलीस ठाण्यास कळवावे, असे पालिका प्रशासनामार्फत आवाहन करण्यात येत आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget