खासदारांच्या निधीमुळे मुंबईत अनधिकृत बबांधकामाचा पेव

पालिका र-थायी समितीत शिवसेनेचा आरोपमुंबई, सोमवार (प्रतिनिधी)- मुंबईतील गजबजलेल्या कुर्ला विभागात खासदार निधीतून अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. पालिका प्रशासन आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत वारंवर तक्रार करूनही केल्या. त्यांच्याकडून अद्याप कारवाई झालेली नाही. उलट दुर्लक्षपणा आणि वेळकाढू धोरण राबविण्यावरच ते भर देत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांच्या रोषाला स्थानिक नगरसेवकांना सामोरे जावे लागत आहे, असा आरोप शिवसेनेने स्थायी समितीत केला. तसेच अशा बांधकामास प्रोत्साहन देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि त्याचा अहवाल समितीला सादर करावा, अशी मागणी यावेळी केली.

पालिका स्थायी समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या नगरसेविका अनुराधा पेडणेकर यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करून अनधिकृत बांधकामाकडे पालिकेचे लक्ष वेधले. कुर्ला येथील एल विभागात पुर्नरचित झालेल्या १६८ प्रभागात उत्तर मध्य मुंबईच्या खासदारांच्या निधीच्या नावाखाली प्रंचड प्रमाणात अनिधकृत बांधकामे होत आहेत. पदपथ, रस्ते किंवा मोकळ्या दिसणाऱ्या जागांवर बांधकामे उभारली जात आहेत. यातील अनेक कामे पूर्ण झाली असून काहींचे मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. विशेष म्हणजे म्हाडामार्फत ही कामे केली जात असून म्हाडाने पालिकेकडून कोणत्याही स्वरुपाचे नाहरकत प्रमाणपत्र घेतलेले नाही, असा आरोप पेडणेकर यांनी समितीत केला. तसेच मिठी नदीच्या सी. आर. झेड भागात, महाराष्ट्र शासनाच्या जागेवर, महापालिकेच्या रस्ते व नाल्यांवर ही कामे सुरु असल्याचे समितीच्या निर्दशनात आणून दिले. महापालिका सहाय्यक आयुक्त अजितकुमार अंबी यांच्याकडे चार वेळा लेखी स्वरुपात तक्रारी केल्या. मात्र त्यांनीही कारवाई करण्यास टाळाटाळ केली. म्हाडाने ही पालिकेचीच री ओढल्याने विभागात बांधकामे वाढत, असे पेडणेकर यांनी सांगितले. तसेच म्हाडा अधिकारी व संबंधित कंत्राटदार यांच्यावर फौजदारी गुन्हा आणि पालिका सहाय्यक आयुक्तांनी अनधिकृत बांधकामे न काढल्यास त्यांच्याविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली. पालिकेने केलेल्या कारवाईचा अहवाल स्थायी समितीला सादर करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पेडणेकर यांच्या मुद्द्याला विरोधीपक्षनेता प्रविण छेडा यांनी समर्थन देत, घाटकोपरमधील अनधिकृत बांधकामेचा मुद्दा उपस्थित केला. दरम्यान, आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, असा खुलासा पालिका अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी समितीसमोर केला.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget