पालिका विकास आराखड्याला दोन महिन्याची मुदत वाढ

मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – मुंबई पालिका निवडणुकीमुळे लटकलेला मुंबईचा सन 2014 - 34 चा विकास आराखडा पालिका सभागृहात सवॅ नगरसेवकांना अभ्यास करून काही हरकती , सूचना मांडण्यासाठी दोन महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय सवॅपक्षीय गटनेते , सदस्य यांनी एकमताने घेतला महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी होकार दशॅवला आहे

मुंबईच्या विकास आराखड्याविषयी नागरिक, लोकप्रतिनिधी आणि विविध संस्था संघटनांच्या आलेल्या सुचना आणि हरकतीवर घाईघाईतच निवडणुकीपूर्वी सुनावणी झाली. तब्बल 12 हजार 800 सुचना आणि हरकती आल्या होत्या. त्याचा निपटारा करणे हे काम किचकट काम होते. गेल्या 26 नोव्हेंबर पर्यंत हे काम पूर्ण करायचे होते. मात्र या मुदतीत हे काम पूर्ण न झाल्याने गेल्या 15 जानेवारी पर्यंत विकास आराखड्याच्या सुचना आणि हरकरतींच्या निपटाऱ्यासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी केली होती त्या दरम्यान पालिकेची आचार संहिता लागू झाला आणि विकास आराखडा लटकला होता विविध लोकप्रतिनिधींच्या हरकती आणि सुचनांवर सुनावणी होत आहे.

लोकप्रतिनिधींच्या बहुतांश हरकती आणि सुचना आरक्षणे हटवा अशीच आहे. विकास आराखडा जसा आहे तसाच ठेवला तर पुन्हा विकास आराखड्यावरून वाद होण्याची शक्‍यता आहे. मुळात पालिकेतून तसेच राज्य सरकाकडून या समितीवर सदस्य नेमण्यात उशीर झाला. 

या आराखड्याचा विषय आज शुक्रवारी पालिका सभागृहनेते यशवंत जाधव यांनी पालिका सभागृहात उपस्थित केला त्यावर र-थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी उपसूचना मांडली आता यावेळी सभागृहात बरेच नगरसेवक नवीन आहेत या नवीन नगरसेवकांना विकास आराखड्याचा अभ्यास करता यावा त्याना हरकती , सूचना मांडता याव्यात यासाठी यावयास आराखड्याला दोन महिन्याची मुदत वाढ देण्यात यावी अशी मागणी केली काँग्रेसचे गटनेते रवी राजा या मागणीला पाठिंबा दिला आराखड्याची माहिती काल रात्री उशिराने नगरसेवकांना दिली त्यामुळे अभ्यास करणे बाकी आहे यापूर्वीच्या आराखड्यात जास्त, चुका, त्रुटी होत्या त्यामुळे तो आराखडा मुख्यमंत्र्यांनी रद्द केला आता या आराखड्याचा अभ्यास करायला नगरसेवकांना वेळ लागेल तेव्हा दोन ते तीन महिन्याची मुदत वाढ देण्याची मागणी केली भाजपा गटनेते मनोज कोटक यांनी नवीन नगरसेवकांना आराखड्याचा अभ्यास करून हरकती व सूचना मांडायला दोन महिन्यांची मुदत वाढ ध्यावी या आराखड्याबाबत गटनेते बैठकीत निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केली सभागृह नेते यशवंत जाधव यांनी 1991 नंतर हा नवीन विकास आराखडा तयार केला जात आहे नवीन नगरसेवकांना तो समजून घेणे अवघड असून पालिकेने साॅप्ट काॅपीसह हाडॅ काॅपीही मराठी भाषेतून दयावी अशी मागणी केली त्यावर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी रमेश कोरगावकर यांची उपसूचना मंजूर केली
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget