सत्तेचा दुरुपयोग करत भाजपाकडून "सेल्फी पॉइंट" सर

मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) – मुंबईतील दादर शिवाजी पार्क परिसरातील तरुणांसाठी आकर्षण ठरलेला सेल्फी पॉईंट बंद करण्याचे मनसेचे स्थानिक नगरसेवक संदीप देशपांडे यांनी जाहिर केल्या नंतर शिवसेना आणि भाजपाने हा सेल्फी पॉईंट सुरु करण्याचे जाहिर केले असले तरी भाजपाने आपल्या राज्यातील सत्तेचा फायदा उचलत महापालिकेकडून परवानगी मिळवली आहे. यामुले आता यावरून पुन्हा राजकीय राडे पहावयास मिळणार आहेत.
शिवाजी पार्क येथील नगरसेवक संदीप देशपांडे यांनी सेल्फी पॉईंट बनवला होता. या पॉईंटला युवक युवती मोठ्या संखेने भेट देत होते. मात्र संदीप देशपांडे यांच्या पत्नीचा या प्रभागातुन पराभव झाल्याने याचा खर्च कोण करणार असा प्रश्न उपस्थित करत देशपांडे यांनी हा पॉईंट बंद करण्याचे जाहिर केले. देशपांडे यांनी सेल्फी पॉईंट बंद करण्याचे जाहिर करताच भाजपा मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी ट्विट करत आता सेल्फी पॉईंट भाजपा सुरु करेल असे म्हटले होते. याच वेळी या प्रभागामधून निवडूण आलेल्या शिवसेनेच्या माजी महापौर विशाखा राउत यांनीही शिवसेना सेल्फी पॉईंट सुरु करेल असा ब्यानर लावला होता.सेल्फी पॉईंट सुरु करण्यासाठी भाजपा आमदार व मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी गुरुवारी (2 मार्च) महापलिकेला पत्र दिले होते. सामान्य जनतेच्या पत्रांकड़े दुर्लक्ष करणाऱ्या पालिकेने काही तासात शेलार याना परवानगी दिली आहे. दादर मध्ये शिवसेनेचा आमदार व शिवाजी पार्क येथे शिवसेनेची नगरसेविका असताना भाजपाने सेल्फी पॉईंट बनवण्यास परवानगी मिळवल्याने आपले आमदार, नगरसेवक नसताना दुसऱ्या लोकप्रतिनिधिंच्या विभागात घुसखोरी करण्याच्या प्रकाराबाबत भाजपा विरोधात संतापाची लाट पसरली आहे.दरम्यान हा सेल्फी पॉईंट मनसेच सुरु करेल असा मनसेनेही ब्यानर लावला आहे. यामुले येत्या दिवसात सेना मनसे आणि भाजपात राजकीय राडेबाजी पाहावयास मिळणार आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget