चाऴीतील आता पाण्याची समस्या लवकरच दूर होणार

मुंबई ( प्रतिनिधी ) – मुंबईही देशाची आर्थिक राजधानी असून या मुंबापुरीत दिड कोटी जनता राहत आहे या मुंबईच्या भौगोलिक रचनेमध्ये डोंगराऴ भागाचा आणि काही समुद्र किना-या लगतच्या सपाट भागाचा समावेश आहे. मुंबई शहरांतील जुन्या इमारतींना (चाळी) पाणी साठवण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही य़ेथे मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा होत नाही. अशा इमारतींना थेट चौथ्या मजल्यापर्यंत पाणी पुरवठा होण्यासाठी जलजोडण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुऴे मुंबईकरांना समप्रमाणात आणि पुरेसा दाबाने पाणी पुरवठा करणे शक्य आहे असे अर्थसंकल्पात उल्लेख केला आहे.
मुंबईतील उंचावरील वसाहतींना पाणी पुरवठा कमी दाबाने होत असून पाण्याच्या वेळाही वसाहतींच्या वेळात असल्याने उंचावरील वसाहतींना कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. त्यात जुन्या जर्जर झालेल्या जलवाहिन्यांमुळे गळतीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे जुन्या वसाहती, चाऴींना पुरेसा दाबाने पाणी पुरवठा होत नाही. समप्रमाणात पाणी पुरवठा होत नसल्याने वर्षानुवर्षाच्या नागरिकांच्या तक्रारी कायम आहेत. ही समस्या दूर करण्यासाठी पालिकेने अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. अशा इमारतींना थेट चौथ्या मजल्यांपर्यंत पाणी पुरवठा होण्यासाठी जलजोडण्यांचे जाळे निर्माण करण्यात आल्याने पुरेसा पाणी पुरवठा होणे शक्य झाले आहे.

मुंबईतील आता झोपडपट्ट्यांना जलवितरण जाळ्याने जोडणारमुंबईत सन 2002 नंतर उभारलेल्या झोपड्या या जलजोडणी मंजुरीसाठी अपात्र असल्याने जलजोडणीचे सेवाक्षेत्र वाढवणे हे पालिकेपुढे मोठे आव्हान होते. मुंबईतील सर्व झोपडपट्ट्यांना त्यांच्या अस्तित्वाचा कालावधी विचारात न घेता जलजोडणी देण्याबाबत प्रशासनाने सादर केलेल्या धोरणाला स्थायी समिती व महापालिका सभागृहाने मान्यता दिली आहे. त्यामुळे येत्या वर्षात अशा सर्व झोपडपट्टया किंवा त्यातील उर्वरित भागांना जलवितरण जाळ्याने जोडून जलवितरण क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे अर्थसंकल्पात म्हटले आहे.

पाणी गळती शोधण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करणारहिलीयम गॅसचा वापर करून गळत्या शोधण्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानाच्या आधारे जलवाहिन्यांमध्ये पाणी नसतानाही गळती शोधण्याचे काम करता येत असल्यामुळे पाण्याची गळती शोधण्याच्या पारंपरिक पध्दतीतील सर्व अडचणींवर मात करणे शक्य झाले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget