पेंग्विन दर्शन आता राजकीय कचाट्यात अडकले

मुंबई शुक्रवार ( प्रतिनिधी ) – मुंबई महापालिकेच्या भायखळा राणीबाग़ येथे दक्षिण कोरियातून 8 हम्बोल्ट जातीचे पेंग्विन मुंबईमध्ये आणल्यापासून चर्चेचा विषय बनला आहे. पेंग्विनचा मृत्यु आणि सोयी सुविधा यामुले लोकायुक्त आणि झु एथोरिटी यांनी आक्षेप घेतले आहे. दरम्यान आता सेना आणि भाजपामधील आपसातील भांडणामुले पेंग्विन दर्शन राजकीय कचाट्यात अडकले आहे.
डिसेंबर महिन्यात स्थायी समितीने राणीबाग़ला भेट दिली होती. यावेळी एक महिन्यात पेंग्विन दर्शन होईल असे सांगण्यात आले होते. दरम्यान आचारसंहिता लागल्याने शाळे मधील प्रथम क्रमांक मिळालेल्या विद्यार्थ्याकडून उदघाटन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र अद्यापही पेंग्विन दर्शन होत नसल्याने स्थायी समितीत याबाबत प्रश्न उपस्थित केला असता एक तारखेला पाण्याचे नमूने चाचणी झाल्यावर लवकरच पेंग्विन दर्शन होईल असे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी सांगितले होते.

या संदर्भात स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा, शिक्षण समिती अध्यक्ष हेमांगी वरळीकर, स्थायी समिती सदस्य विष्णु गायकवाड, रमाकांत रहाटे, यांनी राणीबाग़ला भेट दिली. यावेळी यशोधर फणसे व तृष्णा विश्वासराव यांनी आपला कार्यकाळ 8 मार्चला संपण्या आधी पेंग्विन दर्शन व राणीबाग़च्या नूतणीकरणाचे करावे असा प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.

मात्र प्रशासनाच्या वतीने राणीबाग़चे अधीक्षक डॉ. संजय त्रिपाठी यांनी पेंग्विनसाठी आवश्यक असलेले वातावरण निर्मिती आणि पाणी नमुना तपासणी सुरु आहे. पाण्याचे नमूने अयोग्य असल्याने पेंग्विनना हानी पोहचु शकते. पाण्याचा नमूना चाचणीसाठी पाठवला आहे. तो योग्य आल्यास दोन - तीन दिवसात पेंग्विनना त्यांच्यासाठी बनवण्यात आलेल्या काचेच्या घरात शिफ्ट केले जाईल. त्या नंतर 10-15 दिवस पाहणी करून नंतर सामान्य लोकांना पेंग्विन दर्शन सुरु होईल असे सांगितले. यामुले सत्ताधारी शिवसेनेचा हिरमोड झाला आहे.

सेना भाजपामधील भांडणामुले पेंग्विन दर्शन उशिरा 
पेंग्विन दर्शनाबाबत गेले 6 महीने वेगवेगळ्या तारखा दिल्या जात आहेत. पेंग्विन ज्या ठिकाणी ठेवले जाणार आहेत त्या ठिकाणी पाण्याचे नमूने योग्य नाहीत. पेंग्विनसाठी आजही चांगली व्यवस्था केलेली नाही. शिवसेना आणि भाजप यांच्या राजकारणामुळे पेंग्विन दर्शन मुबईकरांना उशिरा होत आहे. जो पर्यंत योग्य सोयी सुविधा मिळत नाहित तो पर्यंत पेंग्विनना शिफ्ट करणे योग्य ठरणार नाही. सत्ताधार्यानी घाई केल्यास पेंग्विनच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकत असल्याने 8 तारखेनंतर ज्या पक्षाचा महापौर बनेल त्यांच्या हस्ते पेंग्विन दर्शन व राणीबाग़ नुतनीकरणाचे उद्घाटन करावे असे विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा यांनी म्हटले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget