ईव्हीएम मशीन विरोधात आझाद मैदानात निदर्शने

पुन्हा निवडणुका घेण्याची मागणीमुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) – महापालिका, नगरपालिका, निवडणुकी दरम्यान मतदार याद्यांचा व ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाला असल्याने ईव्हीएम मशीन वापरणे बंद करावी, पुन्हा मतदान घ्यावे या व इतर मागण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानात सर्व पक्षीय निदर्शने करण्यात आली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया (आरके) यांच्या नेतृत्वाखाली आयोजित निदर्शनात शिवसेना, समाजवादी आशिष ठाकूर, कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व अपक्ष उमेदवार मोठ्या संखेने सहभागी झाले होते. यावेळी बोलताना मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला होता यामुले अनेक मतदाराना आपला मतदानाचा अधिकार बजावता आलेला नाही. शिवसेनेची हक्काची कुलाबा मधील मते आम्हाला न पड़ता भाजपाला पडलीच कशी असा प्रश्न शिवसेनेचे कृष्णा पवले यांनी उपस्थित केला आहे.

मतदाना वेळी ज्या उमेदवाराला मत दिले त्यालाच मत दिल्याची खात्री मिळत नसल्याने मशीन विश्वासास पात्र नाही. ऑनलाइन फॉर्म भरल्या नंतरही ऑफ़लाइन अर्ज स्विकारण्यात आले. यामुले ऑनलाइन निवडणुक प्रक्रिया बंद करण्यात यावी. भारतात शौचालायाची सोय नसताना शौचालयाचा दाखला मागणे व विविध कर भरल्याच्या पावत्या मागणे, उमेदवार दररोज खर्चाचा तपशील देत असल्याने ऑनलाइन खर्चाची मागणी करणे अयोग्य आहे. उमेवारांकडून पदयात्रा प्रचार फेरीसाठी घेण्यात येणारे शुल्क रद्द करावे इत्यादी मागण्यासाठी निदर्शने करण्यात आली. निवडणुक आयोगाला मागण्याचे निवेदन देवून ईव्हीएम मशीनवर बंदी व पुन्हा निवडणुक घेण्याची मागणी केल्याचे राजाराम खरात यांनी सांगीतले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget