मुंबई पालिका महापौरांची निवडणूक ९ ऐवजी ८ मार्चला


मुंबई, बुधवार(प्रतिनिधी)- मुंबई महापालिकेच्या महापौर पदाची निवडणूक ९ मार्च ऐवजी ८ मार्च घेण्याचा निर्णय पालिका आयुक्त्तांनी घेतला आहे. तर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ४ मार्च ही तारीख घोषीत करण्यात आली आहे.
२०१२ च्या टर्ममधील जुन्या नगरसेवकांची मुदत ८ मार्चला संपुष्टात येत आहे. त्यामुळे ९ मार्च रोजी नवीन महापौर बसवावा लागणार आहे. आधी ९ मार्चला महापौर निवडणूक होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र आयुक्तांनी अचानक तारीख बदलण्याचे फर्मान काढल्याने महापौर निवडणूक आता ८ मार्च होणार आहे. 

दरम्यान, ज्या नगरसेवकांना सभेचा विषय पत्रिका आणि महापौर पदाच्या निवडणुकीचे आमंत्रण चिटणीस विभागाकडून पाठवले, अशानाच निवडणुकीत सहभागी होता येईल असे चिटणीस विभागाकडून सांगण्यात आले. तसेच जुन्या नगरसेवकांची मुदत ८ मार्च रोजी संपत आहे तांत्रिकदृष्टया जुने नगरसेवकपदावर असले, तरी त्यांना बैठकीचे निमंत्रण पाठवण्यात येणार नसून नव्या नगरसेवकांना हे निमंत्रण जातील, असे पालिकेच्या चिटणीस विभागाकडून सांगण्यात आले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget