मुंबईच्या महापौर पदासाठी शिवसेना कॉंग्रेसकडून अर्ज दाखल

मुंबई शनिवार ( प्रतिनिधी ) – शिवसेना आणि भाजपाच्या आपसातील भांडणामुले सर्वांचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेवर महापौर कोणाचा बसणार याचा सस्पेंस आता संपला आहे. भाजपाने निवडणुकीमधून माघार घेतल्याने शिवसेनेचा महापौर होणार हे आता स्पष्ट झाला आहे.

मुंबईच्या महापौर पदासाठी शिवसेनेकडून विश्वनाथ महाड़ेश्वर, उपमहापौर पदासाठी हेमांगी वरळीकर यांनी अर्ज भरला. तर कॉंग्रेसकडून महापौर पदासाठी विट्ठल लोकरे, उप महापौरपदासाठी विन्नीफ्रेड डिसोझा यांनी अर्ज दाखल केला. त्याचवेळी भाजापाने महापालिकेतील कोणत्याही पदासाठी अर्ज दाखल करणार नसून निवडणुक लढवणार नसल्याचे मुख्यमंत्र्यानी जाहिर केले.महापालिकेतील महापौर, उप महापौर, स्थायी समिती, सुधार, बेस्ट समिती अध्यक्ष पदाची निवडणुक लढणार नाही. तसेच विरोधी पक्ष नेते पदही भाजपा घेणार नाही. मुंबईकरांच्या हिताच्या निर्णयासाठी शिवसेनेला पाठिंबा देताना पारदर्शकतेचे पाहरेकारी म्हणून काम करणार. मुंबईमध्ये पारदर्शकता असावी म्हणून उप लोकायुक्त व समिती नेमणार असल्याचे मुख्यमंत्र्यानी जाहिर केले.यामुले शिवसेनेचा महापौर बनण्याचा मार्ग मोकळा झाला असताना राज्यातील भाजपाचे सरकारही सेफ करण्यात मुख्यमंत्री यशस्वी ठरले आहेत. दरम्यान महापालिकेत सदस्य जुळवा जुळवीवरून सुरु झालेला घोड़े बाजार आता बंद झाला आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget