मुंबईत बंदी असतानाही प्लास्टिक थैल्यांची सर्रास विक्री

थैल्यांमधून वाया जाणाऱ्या पाण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष -मुंबई शनिवार ( प्रतिनिधी ) - मुंबईमध्ये २००५ साली आलेल्या जल प्रलयानंतर महापालिकेने २००७ मध्ये पातळ प्लास्टिक थैल्यांवर बंदी घातली. कमी जाडीच्या प्लास्टिक थैल्यांवर बंदी असली तरी होळी आणि धुळीवंदन सणा दरम्यान अश्या थैल्या सर्रास विकल्या जात असल्याने मुंबईमध्ये खरोखरच कमी जाडीच्या प्लास्टिक थैल्यांवर बंदी आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.या प्लास्टिक पिशव्यावर असलेली बंदीची अंमलबजावणी करण्यास पालिका प्रशासन कमी पडली आहे त्यामुळे या पिशव्या एक दिवस पुन्हा पावसाळ्यात मुंबईकरांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे पालिका प्रशासनाच्या या दुलॅक्षामुळे मुंबईकरांना पावसाच्या कालावधी सामोरे आपला जीव मुठीत घेऊन काढावा लागणार आहे

सन २००५ मध्ये मुंबईमध्ये पडलेल्या मुसळधार पावसाबरोबरच प्लास्टिक थैल्यांमुळे पाण्याचा निचरा झाला नसल्याचे समोर आले आहे. प्लास्टिक थैल्यांचे विघटन होत नसल्याने आणि पुनर्वापर होत नसल्याने महापालिकेने मुंबईच्या हद्दीत ५० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक थैल्यांवर बंदी घातली आहे. राज्य सरकाराच्या पर्यावरण विभागानेही अश्या थैल्यांवर बंदी घातली आहे. राज्य सरकार व महापालिकेने अश्या थैल्यांवर बंदी घातली असली तरी होळी आणि धूलिवंदन सणा दरम्यान या थैल्यांची खुले आम विक्री होत आहे दुकानदार , व्यापारी , रस्त्यांवर बसलेले फेरीवाले यांच्या कडे प्लास्टिक पिशव्या मोठ्या प्रमाणात सरसि विकल्या जात आहेत ५ रुपयाला २० ते २५ तर २० रुपयात १०० थैल्या रस्त्यावरील विक्रेत्यांपासून दुकानामध्ये विकल्या जात आहेत.पालिकेने सन 2005 च्या पलयानंतर पालिका प्रशासन आणि राज्य सरकार खडबडून जागी झाली आणि 50 मायकाॅन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक थैल्यांवर बंदी घातली प्लास्टिक पिशवी विक्री करणाऱ्या मोठ्या व्यापारी , दुकानदारावर छापे टाकून धडक कारवाई केली पालिकेने हा खेळ एक दोन वर्षे सुरू ठेवला त्यानंतर या धडक कारवाईवर दुलॅक्ष केले तेव्हा पासून पुन्हा या पिशव्या मोठ्या प्रमाणात विक्री करण्यास सुरुवात झाली आहे या पिशव्यांवर पालिका प्रशासनाने वेळेवर आता लगेच आपला लक्ष केंद्रित केला नाहीतर येत्या पावसाळ्यात पुन्हा 2005 ची पुनॅरावत्ती होण्याची शक्यता आहे या पिशव्या मुंबईकरांचा जीव घोटण्याची शक्यता आहे

मुंबई महापालिकेच्या वतीने झाडे तोडू नये, पाण्याचा गैरवापर करू नये असे आवाहन दरवर्षी महापौर करत असतात. मुंबई पोलिसांच्या वतीनेही फुगे न मारण्याचे आवाहन केले जाते. या आवाहनाला न जुमानता बंदी असलेल्या प्लास्टिक थैल्यांमध्ये पाणी भरून लोकांवर या थैल्या भिरकावल्या जात आहेत. बंदी असलेल्या प्लास्टिक थैल्या सर्रास विकल्या जात आहेत. अश्या थैल्यांमधून पाण्याचा गैरवापर करून पाणी वाया घालवले जात असताना महापालिका प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. त्याच वेळी फुग्यांची जागा गेल्या काही वर्षात प्लास्टिक थैल्यानी घेतल्याने पाण्याने भरलेल्या थैल्या मारणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget