देशात सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई पालिकेचे चक्क 61 हजार 510 कोटी रुपये शहरातील 31 बँकांमध्ये जमा

मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – देशात सर्वात मोठी आणि सोन्याची अंडी देणारी मुंबई पालिका ही सुमारे दिड कोटी जनता मूलभूत सेवा सुविधा पुरवत आहे या पालिकेकडे मोठ्या प्रमाणात पैसाही आहे मात्र या पैसाचा योग्य तो उपयोग पालिका करत नसल्याने मुंबईतील महत्वाचे रर-ते , रुग्णालये , प्रसुतीगृहे , शाळा , पाणी , नाले यांची अवस्था बिकट झाली आहे दरवर्षी मुंबईकरांना याचा त्रास सहन करावा लागत आहे तरी सुद्धा पालिकेतील सत्ताधारी आणि पालिका प्रशासन यांचे डोळे उघडत नाही देशात सर्वात श्रीमंत असलेल्या या पालिकेचे तब्बल 61 हजार 510 कोटी रुपये शहरातील 31 बँकांमध्ये जमा असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे यामध्ये चार खासगी बँकांचाही समावेश असल्याचे समजते एवढा पैसा असताना मुंबईकरांना अनेक समस्यांना सामोरे का जावे लागते पालिका हा पैसा खर्च न करता साठवून का ठेवत आहे असा सवाल मुंबईकर विचारत आहेत 
मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प हा राज्य सरकारच्या खालोखाल आहे यंदाचा अथॅसंकल्प अजून सादर झालेला नाही गेल्या वर्षी पालिकेने 37 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता दरवर्षी वाढत जाणा-या अथॅसंकल्पात पालिका मुंबईकरांना अनेक र-वप्ने दाखवत असते पण याची योग्य प्रकारे अंमलबजावणी करत नसल्यामुळे मुंबईकरांना दरवर्षी त्रास सहन करावा लागतो पावसाळ्यात तर मुंबईकरांना जीव मुठीत घेऊन जीवन जगावे लागत आहे नाले आणि रर-त्यांच्या कामाबाबत रदरवर्षी बोंबाबोंब असते देशात सर्वात श्रीमंत असलेल्या पालिकेचे चक्क 61 हजार 510 कोटी रुपये शहरातील 31 बँकांमध्ये जमा असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे यामध्ये चार खासगी बँकांचाही समावेश असल्याचे समजते या रक्कमेच्या केवळ व्याजापोटी मुंबई पालिकेला तब्बल 4500 कोटी रुपये मिळत आहेत पालिकेने ही रक्कम 1 कोटी 20 लाख मुंबईकरांना वाटली तर प्रत्येक करदाताच्या वाट्याला 51, 250 रुपये येतील.पालिकेच्या 61, 510 कोटी जमा रकमेमध्ये भविष्य निर्वाह निधी आणि निवृत्ती निधी 10,455 कोटी, अतिरिक्त निधी 10,927 कोटी आणि नागरी विशेष निधी 34,258 कोटी रुपयांचा समावेश आहे. जकात करातून मुंबई पालिकेला सर्वाधिक उत्पन्न मिळतं. जकात करातून दिवसाला 12 कोटींची कमाई होते. त्यामुळे एकीकडे मुंबईत रस्ते, पाणी, कचरा अशा मूलभूत सोयींचा अभाव असताना मुंबई पालिकेचा अर्थात सर्वसामान्य मुंबईकरांचा पैसा बँकेत कशासाठी? असा प्रश्न मुंबईकर विचारत आहेत

4500 कोटींमध्ये काय काय शक्य आहे?

प्रत्येक करदात्या मुंबईकराला वार्षिक 51 हजार मिळतील

मुंबई मतदारांना वितरित केले तर प्रत्येकाला 4-5 हजार रुपये मिळतील

शिवराय, बाबासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभं राहील

पालिकेच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 10 लाखांची 45 हजार घरं मिळतील

गिरणी कामगारांच्या घरांचा प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली लागेल

घाटकोपर ते वर्सोवा या अंतराचा एखादा मेट्रो प्रकल्प उभा राहील
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget