मुंबई पालिका निवडणुकीत विजयी उमेदवारांविरोधात चक्क 135 तक्रारी मुंबई पालिका निवडणुकीत विजयी उमेदवारांविरोधात चक्क 135 तक्रारी

मुंबई मंगळवार ( प्रतिनिधी ) – आता नुकत्याच पार पडलेल्या पालिका सन 2017 च्या मुंबई पालिका निवडणुकीत पराभव झालेल्या काही उमेदवारांनी विविध मुद्दयावर न्यायालयात 135 हून अधिक तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारी निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांविरोधात करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये चुकीचे प्रतिज्ञापत्र, जात प्रमाणपत्र आदी तक्रारींचा समावेश आहे. यासाठी पालिकेच्या विधी खात्याच्या अधिका-यांना न्य़ायालयात चकरा माराव्या लागते आहे.

पालिकेच्या सन 2017 च्या निवडणुका 21 फेब्रुवारीला पार पडल्या या निवडणूक लढवताना उमेदवाराला आपली खरी माहिती द्यावी लागते. त्यासाठी प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाते. महत्वाचे म्हणजे जात प्रमाणपत्र, वय, शिक्षण, मालमत्ता, व्यवसाय आदींबाबत प्रतिज्ञापत्रात माहिती उमेदवारांकडून भरली जाते. निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर पराभव झालेले उमेदवार आपल्या प्रतिस्पर्धी विजयी उमेदवाराची प्रत्यक्ष माहिती व प्रतिज्ञापत्रात दिलेली माहिती कशी विसंगत आहे, याकडे लक्ष वेधून आरोप केला जातो. पालिका निवडणुकीनंतर काहींनी तसे जाहिरपणे आरोपही केले. यंदाच्या निवडणुकीनंतर विविध प्रकारच्या सुमारे 135 तक्रारी न्यायालयात दाखल करण्यात आल्या . यांमध्ये 40 टक्के तक्रारी फक्त जात प्रमाणपत्राच्या असल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणी पालिकेच्या विधी खात्याच्या संबंधित अधिका-यांनाही न्यायालयात चकरा माराव्या लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget