पालिका सार्वत्रिक निवडणूक – २०१७ च्‍या तयारी कामांचा मुख्‍य निवडणूक निरि‍क्षकांनी घेतला आढावा

मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) –  पालिका सार्वत्रिक निवडणूक – २०१७ च्‍या निवडणूक पूर्व तयारी कामांचा   राज्‍य निवडणूक आयोगाकडून नेमण्‍यात आलेले मुख्‍य निवडणूक निरिक्षक यु.पी.एस. मदान यांनी पालिका मुख्‍यालयात आज ०९ फेब्रुवारी  रोजी आयोजित करण्‍यात आलेल्‍या बैठकीत आढावा घेतला.

बैठकीला महापालिका आयुक्‍त अजोय मेहता,  पोलिस आयुक्‍त दत्‍तात्रय पडसलगीकर, आयकर आयुक्‍त अमोल कामत,  अति‍रिक्‍त पालिका आयुक्‍त (पूर्व उपनगरे)  संजय देशमुख, उप आयुक्‍त (करनिर्धारक व संकलक) डॉ. बापू पवार, सर्व उप आयुक्‍त, २३ निवडणूक निर्णय अधिकारी, २३ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, १५ निवडणूक निरिक्षक (खर्च) तसेच संबधित पालिका अधिकारी उपस्थित होते.मुख्‍य निवडणूक निरिक्षक यांनी संबधित सर्व अधिकाऱयांकडून निवडणूक पूर्व तयारी कामांचा आढावा घेतला. यावेळी उपस्थित अधिकाऱयांनी त्‍या त्‍या विभागातील उमेदवारांची माहिती देऊन निवडणूकीच्‍या पूर्वतयारी कामांची सवि‍स्तर माहिती मान्‍यवरांना दिली . त्‍या त्‍या विभागातील संबधित अधिकाऱयांनी आपल्‍या विभागातील उमेदवारांची बैठक घेऊन खर्चाचा हिशोब सादर करण्‍याची पध्‍दत व नियम यांची  माहिती उमेदवारांना देऊन त्‍यांच्‍या शंकाचे समाधान करण्‍याची सूचना मुख्‍य निवडणूक निरिक्षक यांनी सर्व उपस्थितांना केली. त्‍याचप्रमाणे संवेदनशिल मतदान केंद्राची यादी तातडीने तयार करण्‍याची सूचना केली. निवडणूकीचे काम हे अतिशय महत्‍वाचे असून यामध्‍ये चुका होता कामा नये, काम करताना काही अडचणी असल्‍यास आपल्‍या वरिष्‍ठांशी संपर्क साधून तातडीने समस्‍यांचे समाधान करण्‍याची सूचना त्‍यांनी सर्व मान्‍यवरांना केली. त्‍याचबरोबर शासनाची यंत्रणा आपल्‍या सर्व प्रचार यंत्रणेवर नजर ठेऊन आहे हे उमेदवारांच्‍या लक्षात यावे,  यादृष्‍टीने आपले काम असले पाहिजे तसेच निवडणूक शांततेत व चांगल्‍यारितीने पार पाडण्‍याची सूचना त्‍यांनी शेवटी केली. प्रारंभी, अति‍रिक्‍त पालिका आयुक्‍त (पूर्व उपनगरे) संजय देशमुख यांनी सादरीकरणाव्‍दारे निवडणूक तयारी कामांची माहिती मान्‍यवरांना दिली
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget