पालिका निवडणुकीची मतमोजणी सुरु होणार सकाळी १० वाजता


मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – पालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ चे मतदान काल (दिनांक २१ फेब्रुवारी, रोजी) पार पडले. या निवडणुकीत ५५.५३% एवढे विक्रमी मतदान झाले असून एकूण ९१,८०,४९१ मतदारांपैकी ५०,९७,५६५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला. त्याची मतमोजणी बृहन्मुंबईतील २३ मतमोजणी केंद्रांवर सकाळी १०.०० पासून सुरु होणार आहे.
मतमोजणी केंद्रांसाठी लागणारी सर्व व्यवस्था तसेच अधिकारी/कर्मचारीवर्ग या अगोदरच नियुक्त करण्यात आला असून सर्व २३ मतमोजणी केंद्रांवर सकाळी ठीक ६.३० वाजता मतमोजणी प्रतिनिधींच्या समक्ष मॉक पोल घेण्यात येणार आहे. या निवडणुकीत एकूण २२७५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत प्रत्यक्षपणे ९६६ कर्मचारी लागणार असून २३ निवडणूक निर्णय अधिकारी व २३ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. तसेच यासंबंधीची सांख्यिकी माहिती संकलित करण्यासाठी साधारणतः १३८ कर्मचाऱयांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आवश्यक तो पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी जाहीर केलेल्या निवडणुक कार्यक्रमानुसार उद्या, दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० पासून मतमोजणी सुरु करण्यात येणार आहे. यासंबंधीचे निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक, प्रशासकीय विभाग/निवडणुक विभाग प्रभाग क्रमांक असणार आहेत
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget