बेस्ट बस प्रवाशांना मिळणार बसमध्ये मोफत वायफाय सुविधा


मुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) – दिवसेंदिवस कमी होणाऱ्या बस प्रवाशांना पुन्हा एकदा आपल्याकडे आकृष्ट करून घेण्यासाठी बेस्ट उपक्रमाने आता बेस्ट बसमध्ये मोफत वाय फाय सुविधा बस प्रवाशांना उपलबद्ध करून देण्याचे ठरविले असून हि सुविधा बेस्ट बसबरोबरच बेस्ट च्या प्रमुख बसस्थानकांमध्ये हि उपलबध्द असणार आहे . आज बेस्ट समिती सभेत आज हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला .
लवकरच हि सुविधा बेस्ट प्रवाशांसाठी देणार असून , त्यामुळे जास्तीतजास्त प्रवाशी बेस्ट कडे आकृष्ठ होतील व बेस्ट चा महसूल वाढेल असा विश्वास बेस्ट ला आहे . बेस्टने ह्यासाठी फिन मोबाईल इंडिया ह्या कंपनीला हे कंत्राट दिले असून , हि कंपनी बेस्ट ला बसमध्ये व प्रमुख बसस्थानकांमध्ये 3 जि व 4 जि चे एकूण ४०१५ रॉयटर्स बसवणार आहे .तसेच काही ठिकाणी जी पी एस सिस्टिम चा वापर करून बेस्ट बस प्रवाशांना मोफत वाय फाय व करमणुकीचे कार्यक्रम उपलंपध्द करून देण्यासाठी क्लाउड मेंनेजमेंट प्लॅटफॉर्म ची तरतूद करणार आहे .

फिन मॅनेजमेंट कंपनीबरोबर हे ३ वर्षाचे कंत्राट असून ह्या साठी बेस्ट ला कोणताही खर्च येणार नसून उलट बेस्ट लाच एकूण ३ वर्षांसाठी सदर कंपनीकडून २. ६३ कोटींचे उत्पन्न मिळणार आहे हि वाय फाय सेवा बेस्ट च्या ५२ प्रमुख बसस्थानकांमध्ये व बेस्ट च्या ३ हजार ९६३ बस मध्ये प्रवाशांसाठी उपलबध होईल .
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget