लोकशाहीच्या उत्सवासाठी 42 हजार पालिका कर्मचारी सज्ज

मुंबई, सोमवार (प्रतिनिधी)- मुंबईतील मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी उद्या मंगळवारी मतदान होत आहे. संपुर्ण देशाचे लक्ष याकडे लागले आहे. ही निवडणूक यशस्वी होण्यासाठी पालिकेनेही कंबर कसली आहे. लोकशाहीच्या या उत्सवासाठी तब्बल 42 हजार कर्मचारी सुमारे 7 हजार मतदान केंद्रावर सेवा बजावण्यास सज्ज झाले आहेत. तसेच केंद्राबाहेर अनुचितप्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा ताफा तैनात केला आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी १५८२ ठिकाणी ७३०४ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. सुमारे ९१ लाख ८० हजार ४९१ मतदार आणि ३८१ तृतियपंथी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सकाळी ७.३० वाजल्यापासून ते संध्याकाळी ५.३० पर्यंत बहुमत मतपेटी नोंदवता येणार आहे. याबाबत मतदान प्रक्रियेच्या तयारीचा पाहणी आढावा घेण्यात आला. या निवडणुकीसाठी अंदाजे 95 कोटी रुपये खर्च येणार आहे. 24 प्रशासकीय विभागातील मतदान केंद्रावर मतदान पेट्या (सीपीसी), सीव्हीएम यंत्रणा आदी साहित्य पुरविण्यात आले आहेत. मतदान केंद्राबाहेर वयोवृध्द व्यक्ती, अंध अपंग मतदार व त्यांच्या सोबती, गरोदर स्त्रिया अथवा तान्ह्या मुलांसह असणाऱ्या स्त्रियांना प्राधान्य दिले जाणार अाहे. शिवाय निवडणुकीवेळी तोतयागिरी केल्यास संबंधितावर पोलिसांमार्फत दखलपात्र गुन्हा नोंदविण्यात येईल. केंद्रामध्ये भ्रमणध्वनी वापरण्यास बंदी असून थुंकण्यासही मनाई केल्याचे फलक लावल्याचे दिसून आले. पालिका क्षेत्रात सुमारे १७ असंवेदनशील तर ६८८ संवेदनशील केंद्र मागील निवडणुकीत २०७ संवेदन तर चार असंवेदनशिल केंद्र होती. मात्र, यंदा त्यात वाढ झाल्याने असंवेदनशील केंद्राच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच सुमारे ४२ हजार ७९७ कर्मचारीवर्ग आणि ३० हजार पोलीस बळ, १३ स्टॅटिक पथके, ९८ भरारी पथके आणि ३९ व्हिडीओ सर्व्हेलियन्स पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. मतदान प्रक्रियेदरम्यान मुंबईकर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क आवर्जून बजावून लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केले आहे. संपूर्ण मतदार यादी महापालिकेच्या www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर नोंदविण्यात आली आहेत. त्याचबरोबर https://localbodyvoterlist.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मतदारांच्या नावाच्या आधारे मतदान केंद्र सोधण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. तसेच मतदारांनी कुठे व कोणत्या केंद्रात मतदान करण्यासाठी जावे, ही माहिती सुलभ व्हावी, यासाठी पालिकेने ट्रु अॅप ( 'True Voter' हे ऍन्ड्राईड ऍप) तयार केला आहे. यामुळे मतदान केंद्र शोधण्याची सुविधा अधिक सोपी होईल, असे पालिकेचे म्हणणे आहे.

मतदानाची टक्केवारी वाढणार ?२०१२ च्या निवडणुकीत सुमारे ४६.५ टक्के तर २०१२ मध्ये ४४. ७५ टक्के मतदान झाले होते. यंदा हा टक्का वाढविण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिल्याने पालिकेने मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम राबवली. तसेच विविध ठिकाणी होर्ल्डिंग, एनएसएस, महाविद्यालयीन विध्यार्थीच्या पदयात्रा, मानवी साखळी, आकर्षक मतदान रथ, डब्बेवाले आणि वासुदेव यांच्या माध्यमातून जनजागृती, आहार असोशिएशनच्यावतीने उपहारगृहात ५ ते १५ टक्के सवलत, उबेर कंपनीतर्फे मोहिम देण्याची सवलत अशा विविध घोषणा करण्यात आल्या. शिवाय, मतदारांना मतदान करता यावे, यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याने यंदा मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.

पक्षनिहाय उमेदवार संख्या शिवसेना २२७, भाजप २११, मनसे २०१, काँग्रेस २२१, राष्ट्रवादी काँग्रेस १७१, बीएसपी १०९, सीपी(आय) १०, सीपी(एम) ११, एस.पी. ७६, जे. डी. एस १०, एल पी १, ए आय एम डी के ३, एमआयएम ५६, अन्य मान्यता पक्ष २५१, अपक्ष ७१७
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget