मतदार यादीतील 11 लाख नावे गायब पालिका स्थायी समितीत पडसाद


चौकशी करून अहवाल सादर करण्याचे प्रशासनाला आदेशमुंबई मंगळवार ( प्रतिनिधी ) - पालिका निवडणुकीत मतदार याद्यांचा मोठ्या घोळाबाबत विविध पातऴीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असतानाच याचे पडसाद मंगळवारी पालिका स्थायी समितीतही उमटले.पालिकेच्या मतदार यादीतून 11 लाख मतदारांची नावे गेली कुठे, हा घोळ नेमका झाला कसा याची चौकशी व्हावी असे आदेश मंगळवारी स्थायी समितीने पालिका प्रशासनाला दिले आहेत. येत्या स्थायी समिती सभेत याबाबतचा अहवाल सादर करावा अशा सूचना स्थायी समितीने केल्या आहेत.
पालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी अनेकांची यादीत नावे नसल्याने मतदान न करताच त्यांना घरी परतावे लागले होते. यादीत 11 लाख मतदारांची नावे नसल्याचे समोर आले. एवढ्या मोठ्या मतदारांची नावे गायब झाल्याने ही नावे नेमकी गेली कुठे असा संतप्त प्रश्नही उपस्थित करण्यात आला. यादीतील नावांच्या घोळाचे पडसाद मंगळवारी स्थायी समितीत उमटले. मतदार यादीतील घोळ प्रकरणी भाजपचे नगरसेवक दिलीप पटेल यांनी स्थायी समितीत हरकतीचा मुद्दा मांडला. त्यावर झालेल्या चर्चेत यादीतील घोळ कसा झाला. तब्बल 11 लाख मतदार गेले कुठे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या यादीतून मराठी नावेच वगळली गेला असल्याचा आरोप सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी केला तसेच मतदार यादीत घोळ झाला नसता तर बहुमत आमचेच असते, असा दावा भाजपचे नगरसेवक दिलीप पटेल यांनी यावेळी केला. दरम्यान मतदार याद्यांच्या घोळाचा वाद आता रंगण्याची शक्यता आहे.

आचारसंहिता लागू असतानाच पालिका यंत्रणेचा वापर --
प्रवीण छेडा यांची चौकशीची मागणी

महापालिका निवडणूक आचारसंहिता लागू असतानाच भाजपचे मंत्री प्रकाश मेहता यांनी महापालिका यंत्रणेचा वापर करून घाटकोपर, गरोडिया नगर या माझ्या विभागातील खासगी क्षेत्रातील चार रस्त्यांची कामे केली असा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी केला. याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करावा असे आदेश प्रशासनाला दिले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget