शिवसेना भाजपाला चार वेळा संधी दिली आत्ता यावेळेस काँग्रेसला संधी देऊन बघा, मुंबईत बदल घडेल आणि मुंबईचा विकास होईल – शशी थरूर

मुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) – पालिकेतील गैरकारभाराबाबत काँग्रेसचे शिवसेना भाजपा विरोधात आरोपपत्र सादर करण्यात आले. आज त्याचे प्रकाशन काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या हस्ते करण्यात आले. या आरोपपत्रात मुंबई पालिकेतील भ्रष्टाचार व घोटाळे उघड केलेले आहेत मुंबईकरांनी शिवसेना भाजपाला पालिकेत चार वेळा संधी दिली आत्ता यावेळेस काँग्रेसला संधी देऊन बघा, मुंबईत बदल घडेल आणि मुंबईचा विकास होईल.खासदार शशी थरूर यानी सांगितले
शिवसेना भाजपा सर्वच विभागात अपयशी ठरलेली आहे. पाणी, रस्ते, कचरा, शिक्षण, सांडपाणी, कचराभूमी या सगळ्या महत्वाच्या मुलभूत सोयी सुविधामध्ये शिवसेना भाजपा संपूर्णतः अपयशी झालेली आहे. गेली २० वर्षे सत्तेत राहून सुद्धा मुंबईकरांना शिवसेना भाजपा सुखकर करू शकलेले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकार फक्त पारदर्शकता आणि चांगला व स्वच्छ कारभाराच्या गोष्टी करतात, परंतु पारदर्शकतेसाठीच काँग्रेस सरकार आग्रही होते म्हणून आम्ही माहिती अधिकार आणला. पण हे भाजपा सरकार माहिती अधिकारात माहिती देत नाही. या सरकारला पंतप्रधानांची शिक्षणाची पदवी ते मुंबई पालिका यामध्ये कुठेही पारदर्शकता नको आहे. राम मंदिर हा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे भाजपा ते कसे काय करणार. हा फक्त निवडणुकीत मतांसाठी मुद्दा आहे, गेली पाच वर्षे मुंबई महानगरपालिकेचे लेखापरीक्षण झालेले नाही. शिवसेना भाजपने लेखापरीक्षण केले नाही, हि खरच खूप मोठी दुर्दैवी गोष्ट आहे. मुंबईकरांनी याचा जाब विचारला पाहिजे. अनेक भ्रष्टाचार आणि घोटाळे केलेले आहेत म्हणून त्यांनी लेखापरीक्षण केलेले नाही. म्हणून यावेळेस काँग्रेसला संधी द्या. मुंबईचा विकास होईल, असा माझा ठाम विश्वास आहे खासदार थरूर यानी व्यक्त केला या पत्रकार परिषदेत संजय निरुपम म्हणाले की भाजपाने शिवसेनेवर आरोपपत्र दाखल करणे हि एक खूप मोठी थट्टाच आहे. गेली २० वर्षे भाजपा शिवसेनेबरोबर पालिकेत सत्तेत आहे. पालिकेतील सर्व भ्रष्टाचारात आणि घोटाळ्यात ते सहभागी होते. स्थायी समितीत भाजपने शिवसेनेला मदत केली, मंजुरी दिली आणि आज युती तुटल्यावर भाजपा शिवसेनेवर आरोपपत्र दाखल करतेय. मुख्यमंत्री म्हणतात पालिकेत भ्रष्टाचार आहे, या भ्रष्टाचारात भाजपचाही सहभाग आहे. पालिकेतील भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांना शिवसेना व भाजपा दोघे हि समान जबाबदार आहेत.याप्रसंगी मुंबईचे माजी सह पोलिस आयुक्त सुरेश मराठे यांनी काँग्रेसमध्ये जाहिर प्रवेश केला. या पत्रकार परिषदेला शशी थरूर यांच्या सोबत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, मनपा विरोधी पक्ष नेता प्रविण छेडा, माजी खासदार एकनाथ गायकवाड, माजी आमदार चरणसिंग सप्रा, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील आणि प्रवक्ते अरुण सावंत उपस्थित होते.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget