बहुजन समाजाच्या एकाच मोर्चासाठी आंबेडकरी तरुणांचे आजपासून उपोषण

मुंबई : अँट्रॉसिटीसह विविध मागण्यांसाठी मुंबईत सर्व आयोजकांनी मिळून एकच सर्वसमावेशक बहुजन मोर्चा काढावा, यासाठी मुंबईतील आंबेडकरी तरुण गुरुवार १९ जानेवारीपासून मुंबईत आझाद मैदानावर उपोषणाला बसत आहेत. काही संघटनांच्या दुराग्रहामुळे जिल्हावार दोन मोर्चे निघाले असले तरी मुंबईसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी आपापसातील दुहीचे चित्र बहुजन समाजासमोर दाखवू नये असे, आवाहन या उपोषणकर्त्या तरुणांनी केले.

अँट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी, मागासवर्गीयांवरील अत्याचाराचे खटले विशेष न्यायालयात चालवणे, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावणे, महार वतनी जमिनींवरील अतिक्रमण काढणे, अल्पसंख्याक, मुस्लिम समाजाला आरक्षण देणे, भटक्या विमुक्तांच्या हक्कांचे संरक्षण करणे यांसह विविध विषयांवर संविधान गौरव महामोर्चा कृती समितीने २४ डिर्सेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर महामोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चाची जोरदार पूर्वतयारी करण्यात आली होती. मात्र, त्याच दिवशी संविधान सन्मान मोर्चा समन्वय सामितीतर्फे आणखी एका मोर्चाचे आयोजन करण्यात आल्यामुळे दुहीचे चित्र दिसू नये म्हणून महामोर्चा कृती समितीने आपला मोर्चा पुढे ढकलला होता.

दरम्यान, बहुजन क्रांती मोर्चा आणि बहुजन हक्क संवर्धन मोर्चा यांनी अनुक्रमे २१ जानेवारी आणि १४ मार्च असे दोन वेगवेगळे मोर्चे मुंबईत घोषित केले आहेत. या आयोजकांनी एकच मोर्चा काढावा, यासाठी संविधान गौरव बहुजन महामोर्चा कृती समितीच्या तरुणांनी दोन्ही मोर्चा आयोजकांसोबत चर्चा केल्या. मात्र, या चर्चा निष्फळ ठरल्या. हे दोन्ही आयोजक एक मोर्चा आयोजित करू शकले नाहीत, अशी खंत उपोषणकर्त्या तरुणांनी व्यक्त केली आहे. या पार्श्‍वभूमीवर बहुजन समाजाचा मुंबईत एकच मोर्चा निघावा, यासाठी जनतेसमोर जाण्याचा निर्णय संविधान गौरव महामोर्चा समितीच्या तरुणांनी घेतला असून यासाठी गुरुवार, १९ जानेवारीला १0 वाजता मुंबईच्या आझाद मैदानावर हे तरुण उपोषणासाठी बसणार आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget