भारिप बहुजन महासंघ व डाव्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

मुंबई मंगळवार ( प्रतिनिधी ) – पालिकेची निवडणुकीच्या तोंडावर आघाड्या आणि युती तुटली असताना भारिप बहुजन महासंघ, रिपब्लिकन सेना, शेकाप व डाव्या पक्षांनी एकत्र येत आघाडी केली आहे. या आघाडीच्या ब्यानरखाली मुंबई महानगर पालिकेची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा सीपीआयचे नेते प्रकाश रेड्डी यांनी दिली.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत रेड्डी बोलत होते. यावेळी रेड्डी यांच्यासह शिवकुमार दामले, शेकापचे प्रकाश नार्वेकर, भारिप बहुजन महासंघाचे सुनील पवार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुंबई महापालिकेच्या २२७ जागांपैकी भारिप बहुजन महासंघ ६१, सीपीआय १०, सीपीएम १३, शेकाप १३, एलएनपी २ सीपीआय (एमएल) १ जागा लढवणार असल्याचे सांगण्यात आले. पत्रकार परिषदेत भारीप बहुजन महासंघाच्या ५४, माकपाच्या १३, तर सीपीआयच्या ७ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेला १९ जागा देण्यात आल्या असून आणखी ७ जागांची मागणी रिपब्लिकन सेनेकडून करण्यात आली आहे. या मागणी नुसार या ७ जागा सोडण्यासाठी विचार करण्यात येत असल्याचे भारिपचे मुंबई अध्यक्ष सुनील पवार यांनी सांगितले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget