पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत नगरसेवक विसरले पालिकेतील समित्यांच्या बैठका कोरम अभावी शिक्षण व सुधार समिती सभा तहकूब

मुंबई मंगळवार ( प्रतिनिधी ) – पालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू झाली आहे या निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर पालिकेत होणा-या सभांना विद्यमान सदस्यांची उपस्थिती कमी झाली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत समित्यांच्या होणा-या सभाही नगरसेवक विसरल्याची स्थिती आहे. मंगळवारी आयोजित करण्यात आलेली शिक्षण समिती व सुधार समिती बैठकांना बहुतांशी नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने अध्यक्षांना कोरम अभावी सभाच तहकूब करावी लागली.
पालिका निवडणुकीसाठी पुन्हा तिकीट मिळवण्यासाठी सर्वच पक्षातील विद्यमान नगरसेवक प्रयत्नांत आहेत. काही पक्ष कार्यालयात तिकीटासाठी उमेदवारांच्या रांगा लागल्या आहेत. वॉर्ड पुनर्रचना व आरक्षणात ज्या नगरसेवकांना फटका बसला आहे अशा नगरसेवकांनी आपल्या नातेवाईकांना किंवा दुस-या बाजूच्या वॉर्डमध्ये तिकीट मिळवण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. ज्यांना तिकीट मिळण्याची शक्यता नाही असे दुस-या पक्षात किंवा बंडखोरीच्या तयारीत आहेत. निवडणुकीच्या या धामधुमीत विद्यमान नगरसेवकांना पालिकेतील समिती सभांचा विसर पडल्याचे चित्र बघायला मिळाले. समितीमध्ये विविध पक्षांचे 26 सदस्य असतात. कोरम पूर्ण होण्यासाठी 9 सदस्यांची आवश्यता असते. मात्र मंगळवारी अनुक्रमे समिती सभांना चार ते पाच नगरसेवकच उपस्थित राहिल्याने समिती अध्यक्षांना सभा तहकूब करावी लागली. त्यामुळे सभांतील महत्वाचे विषय मंजुरी शिवाय रखडणार आहेत. शिवाय सभा आयोजित करण्यापूर्वी सभांचा अजेंडा नगरसेवकांच्या घरपोच करण्यासाठी येणारा वाहतूक खर्च, प्रिटींग खर्च, कर्मचा-यांची अधिका-यांची मेहनत, सभासाठी चहा, नाश्तासाठीचा खर्च यामुळे वाया गेला आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget