शिवसेना भाजपा युती तोडणे हा एक खूप मोठा फार्स आहे, नाटक आहे, ढोंग आहे - संजय निरुपम

युती तोडली मग दिल्लीत व महाराष्ट्रात सत्तेत का राहता ? - संजय निरुपम
मुंबई शुक्रवार ( प्रतिनिधी ) – शिवसेना व भाजपाची युती तुटली मग दिल्लीत व महाराष्ट्रात शिवसेना समर्थन मागे का घेत नाही ? असा सवाल उपरि-थत करत शिवसेना भाजपा युती तोडणे हा एक खूप मोठा फार्स आहे, नाटक आहे, ढोंग आहे. मुंबईतील सर्व सामान्य जनतेची हि दिशाभूल आहे. शिवसेनेने युती जर तोडली तर त्यांनी ताबडतोब दिल्लीतील व महाराष्ट्रातील आपले समर्थन काढून टाकावे. सर्व शिवसेनेच्या मंत्र्यांनी त्वरित राजीनामे द्यावेत, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांगितले
शिवसेना नेहमीच भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव्या देते मग भाजपनेही पुढाकार घेऊन शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना काढून टाकावे. भाजपमध्ये एवढी धम्मक व हिम्मत नाही आहे काय ? युती तोडणे हे एक खूप मोठे षडयंत्र आहे. शिवसेना व भाजपाची मुंबई महानगरपालिकेत गेली २२ वर्षे सत्ता आहे. दोघांनी मिळून अनेक भ्रष्टाचार व घोटाळे केलेले आहेत. दोघे हि मुंबई महानगरपालिका सक्षमरित्या चालवू शकलेले नाहीत. ते अकार्यक्षम ठरलेले आहेत. मुंबईकरांना मूलभूत सुविधा ते देऊ शकलेले नाहीत. मुंबईकर निराश झालेले आहेत. कंटाळलेले आहेत. युतीच्या भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांपासून मुंबईकरांचे मन दुर्लक्षित करण्यासाठी हे युती तोडण्याचे एक नाटक आहे, षडयंत्र आहे. माझे शिवसेना व भाजपाला आवाहन आहे कि, जर खरंच युती तोडली आहे तर त्यांनी समस्त मुंबईकरांना लेखी स्वरूपात द्यावे. लोकांची दिशाभूल करू नये. दोन्ही पक्षाने लेखी स्वरूपात युती कायमची तोडली असे जाहीर करावे. दिल्ली व महाराष्ट्रात युती नाही व यापुढे हि भविष्यात युती होणार नाही, असे लेखी स्वरूपात द्यावे येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मुंबईकर मतदार शिवसेना भाजपाला त्यांची जागा दाखवून देतील. त्यांच्या भूलथापांना ते आता बळी पडणार नाहीत. मुंबईकरांना चांगले माहित आहे कि, गेली २२ वर्षे त्यांनी फक्त भ्रष्टाचार आणि घोटाळे केले. मुंबईकर युतीच्या या भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांमुळे त्रस्त झालेले आहेत, त्यामुळे यावेळेस मुंबईत बदल घडणार आणि काँग्रेसचं भरघोस मतांनी निवडणूक जिंकणार, असा माझा ठाम विश्वास आहे. मुंबईकरांना आता बदल आणि मुंबईचा विकास पाहिजे आहे आणि तो बदल आणि विकास काँग्रेसचं करू शकते, असेही वचन संजय निरुपम यांनी दिले
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget