रिपब्लिकन पक्षाला गत वैभव मिळवून देण्यासाठी स्वबळावर लढणार - मनोज संसारे

कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून निवडणूक लढवणार नाही
मुंबई शुक्रवार ( प्रतिनिधी ) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पक्ष भारतातला तीन क्रमांकचा पक्ष होता. बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाला प्रबळ पक्ष बनवण्याचे स्वप्न बघितले होते. परंतू सध्या रिपब्लिकन पक्षाची ससेहोलपट सुरु आहे. संधीसाधू स्वयंभु नेत्यांनी रिपब्लिकन पक्षाला राजकीय ओळख निर्माण करून दिलेली नाही. महायुती आणि आघाडी याच्या माध्यमातून उमेदवार निवडून येतील असा भ्रम रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये केला आहे. रिपब्लिकन पक्षातील संधीसाधू नेत्यांमुळे रिपब्लिकन पक्षाला गल्लीबोळातील पक्ष म्हणून ओळख निर्माण झाली आहे. अश्या नेत्यांनी रिपब्लिकन पक्षाला स्वतःच्या स्वार्थासाठी वापर केला आहे. यामुळे रिपब्लिकन पक्षाला बदनाम करण्यात आले आहे. रिपब्लिकन पक्षाची ही ओळख पुसून काढण्यासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष - युथ रिपब्लिकन मुंबई महानगर पालिकेसह महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा लढवणार असल्याची माहिती मनोज संसारे यांनी दिली.
मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रिपब्लिकन पक्षाची सध्या झालेली वाताहत दूर करण्यासाठी आणि कोणाशीही युती आघाडी न करता रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार स्वबळावर निवडून येऊ शकतो हि भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण करण्यासाठी सर्व महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणूका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी फुले, शाहू, आंबेडकर, विचारांवर काम करणाऱ्या प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली जाणार आहे. मुंबई महापालिकेच्या ९६, ठाणे महापालिकेच्या ३६, उल्हासनगर महापालिकेच्या १७, नाशिक महानगरपालिकेच्या १२ तर सर्व जिल्हापरिषदेच्या प्रत्येकी २-३ जागा लढवणार असून याद्वारे रिपब्लिकन पक्षाला मान्यता मिळवून देणार आहे. रिपब्लिकन पक्षातील संधीसाधू नेत्यांनी आज पर्यंत स्वतःसाठी राजकीय पदे मिळवली. कार्यकर्त्यांना अद्याप कोणत्याही प्रकारची पदे मिळवून देण्यात हे संधीसाधू नेते अपयशी ठरले आहेत. कार्यकर्त्यांना सत्तेत पाठवता यावे म्हणून मी स्वतः किंवा आमच्या पक्षातील पदाधिकारी महापालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लढवणार नसल्याचे संसारे यांनी सांगितले.

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget