८० लाख जन्म-मृत्यू दाखले ऑनलाईन स्वरुपातही उपलब्ध होणार !

मुंबई शुक्रवार ( प्रतिनिधी ) – पालिकेद्वारे दिल्या जाणा-या विविध सेवा सुविधांच्या अनुषंगाने अनेक बाबी यापूर्वीच ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन दिल्या आहेत. याअंतर्गत १ जानेवारी २०१६ पासूनचे पालिका क्षेत्रातील जन्म व मृत्यू दाखले यापूर्वीच ऑनलाईन पद्धतीने www.crsorgi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. याच श्रृंखले अंतर्गत सन १९८८ पासून मुंबईत झालेले मृत्यू आणि १९९० पासूनचे मुंबईतील जन्म यासंबंधीची प्रमाणपत्रेही 'ऑनलाईन' स्वरुपात उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही आता प्रगतीपथावर आहे. यामुळे सुमारे ८० लाख जन्म-मृत्यू दाखले ऑनलाईन पद्धतीने सहजपणे उपलब्ध होण्याचा मार्ग खुला होणार आहे. ज्यामुळे घर बसल्या जन्म-मृत्यू दाखले मिळण्यासोबतच देश-विदेशात असणा-या मुंबईकरांना देखील ते ज्या ठिकाणी असतील, तिथेच जन्म-मृत्यू दाखला सहजपणे मिळण्याची सोय होणार आहे. विशेष म्हणजे या सर्व ऑनलाईन प्रमाणपत्रांवर 'क्यूआर कोड' असल्याने प्रमाणपत्रांची अधिकृतता व विश्वासार्हता सहजपणे तपासता येणार आहे, अशी माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. श्रीमती पद्मजा केसकर यांनी दिली आहे.
सन १९८८ पासून ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतच्या म्हणजेच गेल्या सुमारे २७ वर्षातील मृत्यू विषयक नोंदी पालिकेच्या 'इआरपी' 'सॅप' संगणकीय प्रणालीवर यापूर्वीच अद्ययावत करण्यात आल्या आहेत. तर १९९० पासून २०१५ पर्यंतच्या गेल्या २५ वर्षातील जन्म नोंदी देखील सदर संगणकीय प्रणालीवर नोंदविण्यात आल्या आहेत. यानुसार सुमारे ८० लाख नोंदी पालिकेने यापूर्वीच डिजिटलाईज केल्या आहेत. या सर्व नोंदींशी संबंधित जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे केंद्र शासनाच्या नागरी नोंदणी यंत्रणेच्या www.crsorgi.gov.in या संकेत स्थळावर लवकरच उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे.पालिका क्षेत्रातील जन्म-मृत्यू संकेतस्थळाद्वारे सुमारे ८० लाख प्रमाणपत्रे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन देताना या सर्व प्रमाणपत्रांवर 'क्यूआर कोड' देखील नमूद करण्यात येणार आहे. ज्यामुळे या प्रमाणपत्रांची अधिकृतता ऑनलाईन पद्धतीनेच तपासणे शक्य होणार आहे. या अंतर्गत जन्म-मृत्यू विषयक प्रमाणपत्रावरील 'क्यूआर कोड', ऍन्ड्रॉईड आधारित भ्रमणध्वनीमधील 'क्यूआर कोड रीडर' या ऍपच्या सहाय्याने कॅमे-याद्वारे स्कॅन केल्यास भ्रमणध्वनीवर इंटरनेट ब्राउजरवर संबंधित संकेतस्थळावरील प्रमाणपत्राचे पान उघडले जाणार आहे. यामुळे संबंधित प्रमाणपत्राची अधिकृतता व विश्वासार्हता त्वरित तपासणे शक्य होणार आहे, अशीही माहिती डॉ. केसकर यांनी दिली
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget