एमआयएम प्रथमच मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणांगणात


पहिली 18 उमेदवारांची यादी जाहीर
काँग्रेसला जाणार जड
मुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) – सोन्याची कोंबडी असलेल्या प्रथमच पालिका निवडणुकीच्या रणांगणांत उतरलेल्या एमआयएमने सोमवारी 18 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून निवडणुकीचे बिगुल वाजवले आहे. मुंबईत एकूण 50 जागेवर उमेदवार उभे केले जाणार असून येत्या दोन दिवसांत दुसरी यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती पक्षाचे नेते आमदार वारिस पठाण यांनी दिली.

मागील विधानसभा निवडणुकीत भायखळा व औरंगाबाद येथून अनुक्रमे एमआयएमचे दोन आमदार निवडून आले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर, औरंगाबाद आणि कल्याण डेांबिवली महापालिका निवडणुका पार पडल्या. औरंगाबादमध्ये एमआयएमचे २५ नगरसेवक निवडून आल्याने सगळयांच्या भुवया उंचावल्या. तर कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत एमआयएमने सात उमेदवार रिंगणात उतरविले होते त्यापैकी दोन नगरसेवक निवडून आले. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लढवण्यासाठी एमआयएमने लक्ष केंद्रीत केले आहे. मुंबईत एमआयएमचा एक आमदार निवडून आल्याने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एमआयएमने मुंबई शहरात मोर्चेबांधणी सुरू केली. मुस्लीम मतदार असलेल्या वॉर्डमध्ये त्यांनी मागील काही महिन्यांपासून तयारी केली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत एक आमदार निवडून आला असला तरी इतर मतदार संघातही एमआयएमच्या उमेदवाराने ब-यापैकी मते घेतली होती. आता महापालिका निवडणुकीत मुस्लीम मतदार असलेल्या वॉर्डमध्ये उमेदवार उभे करून एमआयएमने काँग्रेस, सपासमोर आव्हान उभे केले आहे. सपा, काँग्रेस व राष्ट्रवादी स्बळावर निवडणूक लढण्याचा नारा दिला आहे. राष्ट्रवादीने व सपाने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. सोमवारी एमआयएमने पहिली यादी जाहीर करून पालिका निवडणूकीच्या रणसंग्रामात उतरण्याचे जाहिर केले. पहिल्या यादीत वांद्रे, गोवंडी, चारकोप, दिंडोशी, अंधेरी या विभागात उमेदवार उभे केले आहेत. मोजक्याच जवळपास 50 जागा लढण्याचा निर्णय एमआयएमने घेतला आहे.

ओवैसी बंधू प्रचारात उतरणारमुंबई महापालिका निवडणुक जिंकण्यासाठी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी आणि त्यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी हे बंधू स्वत: प्रचारात उतरणार आहेत. यादी जाहीर करण्यापूर्वी ओवेसी बंधूच्या उपस्थितीत एमआयआमच्या दोन सभा झाल्या. निवडणुकीच्या प्रचारासाठी जवळपास 30 सभा होणार असल्याचे सांगण्यात आले.

काँग्रेसच्या वखारूनिस्सा अन्सारी एमआयएममध्ये?काँग्रेसच्या बी वॉर्डमधील ज्येष्ठ नगरसेविका वखारुनिस्सा अन्सारी या काँग्रेसला रामराम ठोकून एमआयएममध्ये प्रवेश करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. एमआयएमच्या नेत्यांना भेटून त्यांनी याबाबत चर्चा केली असल्याच्या वृत्ताला आमदार वारिस पठाण यांनी दुजोरा दिला. दरम्यान प्रवेशाबाबतचा अधिकृत निर्णय लवकरच जाहीर केला जाणार आहे.

पहिली यादी -1) मोहम्मद शमीम - वॉर्ड क्रमांक - 20
2) शकीर शेख - वॉर्ड क्रमांक - 43
3) नसरीन खान - वॉर्ड क्रमांक - 44
4) शेख आरिफ - वॉर्ड क्रमांक - 66
5) शगुफ्ता चौधरी - वॉर्ड क्रमांक - 87
6) अॅड. अदील खतरी - वॉर्ड क्रमांक - 96
7) गुलनाझ कुरेशी - वॉर्ड क्रमांक - 92
8) शरिफ इब्राहिम - वॉर्ड क्रमांक - 139
9) मोहमद कुरेशी - वॉर्ड क्रमांक - 162
10) सुजाता भालेराव - वॉर्ड क्रमांक - 189
11) उमर साद - वॉर्ड क्रमांक - 208
12) मोहमद कुरेशी - वॉर्ड क्रमांक - 211
13) हाजी निसार शेख - वॉर्ड क्रमांक - 221
14) पुष्पा बळराज - वॉर्ड क्रमांक - 188
15) जमाल खान - वॉर्ड क्रमांक - 164
16) नजमीन खान - वॉर्ड क्रमांक - 49
17) गुलमीनाझ बेगाम - वॉर्ड क्रमांक - 187
18) मतीन नायक - वॉर्ड क्रमांक - 209
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget