कॅरम : रिझर्व्ह बँक विजेता, बेस्ट उपविजेता

मुंबई : २६व्या वरिष्ठ मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेमधील आंतर संस्था सांघिक ब गटात रिझर्व्ह बँकेने साखळी ६ गुणांसह अंतिम विजेतेपद तर बी.ई.एस.टी.-बेस्ट अ संघाने साखळी ५ गुणांसह उपविजेतेपद पटकावले. रिझर्व्ह बँकेला ब गटाचे विजेतेपद मिळवून देण्यात विश्‍वविजेता कॅरमपटू प्रशांत मोरे व हिदायत अन्सारी यांचा प्रमुख वाटा होता. लालबाग येथील न्यू हनुमान थिएटर मंगल कार्यालय सभागृहात निर्णायक साखळी सामन्यात बेस्ट संघाने रिझर्व्ह बँक विरुद्ध कडवी झुंज देताना १-२ अशी हार पत्करली. संदीप जोगळेकर व अशोक खरात यांनी दुहेरीचा सामना जिंकून बी.ई.एस.टी. संघाचे आव्हान शेवटपर्यंत जिवंत ठेवले होते. आंतर संस्था सांघिक ब गटाचे तृतीय स्थान माझगाव डॉक अ संघाने साखळी ४ गुणांसह मिळविले.
सध्या फॉर्ममध्ये असलेल्या विश्‍वविजेत्या प्रशांत मोरेने अंकुश गायकवाडचा २५-१६, २५-९ असा पराभव करून रिझर्व्ह बँकेला १-0 अशी आघाडी मिळवून दिली. दुहेरीच्या लढतीत मात्र बी. ई. एस. टी. संघाचे संदीप जोगळेकर व अशोक खरात यांनी अजय आंब्रे व अशोक साळवी या रिझर्व्ह बँक जोडीचा २५-८, ८-२५, २५-१७ असा पराभव करून १-१ अशी बरोबरी केली. त्यामुळे रिझर्व्ह बँकेचा हिदायत अन्सारी विरुद्ध बेस्टचा मंगेश भालेराव यामधील लढत अपेक्षेप्रमाणो रंगतदार झाली. हिदायतने पहिला गेम २५-८ असा जिंकल्यावर मंगेशने दुसरा गेम २५-७ असा घेत १-१ अशी बरोबरी केली. तिसर्‍या गेममध्ये हिदायत अन्सारीने खेळात अचूकता आणताना अप्रतिम यशस्वी फटके साधले आणि तिसरा गेम २५-१0 असा जिंकत रिझर्व्ह बँकेच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget