राधे मा प्रकरणी कारवाईस पोलिसांची टाळाटाळ -

पोलिसांविरोधात न्यायालयाचा अवमान याचिका दाखल करणार
मुंबई मंगळवार ( प्रतिनिधी ) – स्वतःला ईश्वरी देवी असल्याचे भासवणाऱ्या राधे माँ विरोधात न्यायालयाने आदेश देऊनही कारवाई केली जात नसल्याने मुंबई पोलिसांविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याचा दावा केला जाणार असल्याची माहिती युनायटेड काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस असद पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांच्या सोबत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस संजय खन्ना उपस्थित होते.
मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राधे माँ यांनी कायदा धाब्यावर बसवत विमानांमधून त्रिशूल नेला होता. याबाबत अंधेरी येथील कोर्टात तक्रार दाखल केल्यावर न्यायालयाने एअर पोर्ट पोलीस ठाण्याला गुन्हा नोंदवून कारवाई करण्याचे आदेश दिले. मागील वर्षी २९ मार्च २०१६ ला आदेश देऊनही अद्याप पोलिसांनी राधे माँ वर कोणतीही कारवाई केलेली नाही. पोलिसांनी राधे माँला साधे चौकशी साठीही बोलावलेले नाही. यावरून पोलीस राज्य सरकार राधे माँ ला पाठीशी घालत असून राधे माँ वर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचे स्पष्ट होत आहे. राधे माँने गेल्या १५ वर्षात अफाट संपत्ती मिळवली आहे याची चौकशी सुरु असताना पोलीस तिच्यावर कारवाई करण्यास का टाळाटाळ करत आहेत असा प्रश्न पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस संजय खन्ना यांनी उपस्थित केला आहे. राधे माँ प्रकरणी अंधेरी येथे सुरु असलेल्या केसच्या सुनवाई दरम्यान पोलीस न्यायालयाचे आदेश पाळत नसल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून देणार आहोत. न्यायालयाने दिलेले आदेश पोलीस पाळत नसल्याने पोलीस आणि राधे माँ यांना सहकार्य करणाऱ्या सर्वांवर न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी दावा दाखल करणार असल्याचे असद पटेल यांनी सांगितले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget