मुंबई जिल्हा कॅरम स्पर्धा - मुंबई महानगरपालिका अजिंक्य

मुंबई : मुंबई महानगरपालिका क संघाने २६व्या वरिष्ठ मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेमधील आंतर संस्था सांघिक क गटाचे अजिंक्यपद पटकावले. माझगाव डॉक ब संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. साखळी सामन्यातून दुसर्‍या स्थानावर राहिलेल्या मुंबई महानगरपालिकेने अंतिम फेरीत धडक मारली आणि माझगाव डॉक ब संघाचे आव्हान ३-0 असे संपुष्टात आणून अजिंक्यपदाला गवसणी घातली. मुंबई महानगरपालिका संघाच्या विजयाचे शिल्पकार विक्रम पवार, प्रमोद जाधव, जगदीश पवार व मंगेश कासारे ठरले.
लालबाग येथील न्यू हनुमान थिएटर मंगल कार्यालय सभागृहामधील मुंबई महानगरपालिका क संघ विरुद्ध माझगाव डॉक ब संघ यामधील लढत प्रेक्षकांच्या अपेक्षेप्रमाणो रंगली नाही. मुंबई महानगरपालिका संघाच्या कॅरमपटूंनी धडाकेबाज व अचूक खेळ करून प्रतिस्पध्र्यांना दबावाखाली खेळण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांनी लढती एकतर्फी करून सहज विजय मिळवला. मुंबई महानगरपालिकेच्या विक्रम पवारने माझगाव डॉकच्या इम्रान नाईकला २५-८, २५-८ असे, तर मुंबई महानगरपालिकेच्या प्रमोद जाधवने सत्तार नाईकला २५-0,२५-११ असे सहज हरवले. पालिकेच्या जगदीश पवार व मंगेश कासारे जोडीने माझगाव डॉकच्या सागर पालशेतकर व प्रवीण शिंदे जोडीवर २५-0, २५-२0 असा विजय मिळवला आणि मुंबई महानगरपालिका संघाच्या ३-0 विजयावर शिक्कामोर्तब करून आंतर संस्था क गटाचे विजेतेपद पटकावले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget