बेस्टच्या भंगार बसविक्रीमध्ये आर्थिक घोटाळा होत असल्याचा सदस्यांचा आरोप

मुंबई -दि २४ बेस्टच्या भंगारात जाणाऱ्या बसगाड्यां विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून राखीव असलेल्या किमतीपेक्षा खूप किमतीत बसगाड्या विकल्या गेल्या तसेच चांगल्या दर्जाच्या व वापरात असलेल्या बसगाड्या विकल्या गेल्याने बेस्टचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून ह्या नुकसानीला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी बेस्ट समिती सदस्यांनी आज बेस्ट सभेत केली .बेस्टच्या बस ताफ्यात आता वोल्वो च्या जपानीज बनावटीच्या दोन वातानुकूलित बसगाड्या प्रायोगिक तत्वावर देण्यात येणार आहेत त्या प्रस्तावावर बोलताना बेस्ट समिती सदस्यांनी बेस्टची सध्याची बसगाड्यांची केविलवाणी अवस्था बैठकीसमोर मांडली .व ह्याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली .
बेस्टच्या ताफ्यातील बस दिवसेंदिवस कमी होत आहेत , त्यात नवीन येणाऱ्या ३०३ बसगाड्याही येण्यास दिरंगाई होत आहे , जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात येणारी नमुना बसही आता पुढील महिन्यात येणार असल्याने त्यामुळे उर्वरित बसही दोन महिन्यांनंतर येणार आहेत . बेस्टच्या ताफ्यातील बस कमी झाल्याने रस्त्यावरील बसची संख्या कमी झाली आहे त्यातच मुंबई शहर व उपनगरात मेट्रोची कामे सुरु झाली आहेत , त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याने बस वेळेवर येत नाहीत , बस कमी त्यात बस वेळेवर येत नाहीत त्यामुळे प्रवाशांची संख्या कंमी होऊन बेस्टच्या उत्पन्नातही मोठी घट झाली आहे . त्यात बेस्ट च्या बसताफयातील साध्या बसगाड्यांचे आयुर्मान संपल्यामुळे भंगारात काढाव्या लागल्या आहेत . त्यात चालू स्तिथीतील वातानुकूलित बसही बेस्टने भंगारात काढल्याने बेस्ट समिती सदस्यांनी याबाबत संताप व्यक्त केला . बेस्ट अधिकाऱ्यांचा बस भंगारामध्ये एव्हढा रस का ? तसेच साध्या बसगाड्या भंगारात काढताना राखीव किंमतीपेक्षाही कमी किमतीत विकल्या गेल्याने बेस्टला कोट्यवधीचे नुकसान सोसावे लागले असे निदर्शनास आणून देताना बेस्ट समिती सदस्यांनी सांगितले कि , वातानुकूलित बसगाड्या या चालत नाहीत म्हणून त्या भंगारात काढणे योग्य नसून , बेस्टने नुकतेच तीन वातानुकूलित बसगाड्यांचे रूपांतर साध्या बसमध्ये केले त्याचा खर्च फक्त पाच लाख आला . या बस बाहेरून रूपांतर करून घेतल्यास खर्च कमी होतो , व बसही सात ते आठ वर्षे वापरण्यास योग्य होते . असे असताना बेस्टच्या अधिकारी ह्या बस विकण्याचा आटापिटा का करत आहेत अशा प्रकारे आपल्या कामात हलगर्जीपणा करून बेस्ट च्या नुकसानीस कारणीभूत ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी बेस्ट सदस्यांनी यावेळी केली .

पुढील महिन्यात बेस्ट च्या ताफ्यात वातानुकूलित जापनीज बस जपानच्या निसान कंपनीच्या यु डी ब्रॅण्डच्या दोन वातानुकूलित बसगाड्या ९० दिवसांच्या प्रायोगिक तत्वावर चालवण्यासाठी बेस्ट उपक्रमास विनामूल्य उपलबध होणार आहेत प्रख्यात वोल्वो कंपनीकडून भारतात ह्या बनावटीच्या बसगाड्या प्रथमच येणार असून या बसगाड्या प्रवाशांच्या पसंतीस उतरल्या तर बेस्ट ह्या प्रकारच्या वातानुकूलित बसगाड्या मुंबईकरांसाठी खरेदी करण्याची शक्यता आहे .
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget