मुंबईत काँग्रेसशी फारकत, इतरत्र आघाडीची चर्चा सुरू - तटकरे

मुंबई : मुंबई महापालिकेसाठी काँग्रेससोबत आघाडी करण्याची आता संभावना नाही, असे सांगतानाच राज्यातील इतर जिल्ह्यांत महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी व काँग्रेसदरम्यान आघाडीची चर्चा सकारात्मक पद्धतीने सुरू असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.
समविचारी पक्षांशी आघाडी करण्याची राष्ट्रवादीची भूमिका आहे. मात्र मुंबईत काँग्रेसने आधीच उमेदवारांची यादी जाहीर केल्याने या पक्षाशी आघाडी करण्याची संभावना आता संपली आहे. काँग्रेसचे मुंबईतील स्थानिक नेते आणि त्यांच्या प्रदेशातील नेत्यांमध्ये समन्वय नसल्याने दुर्दैवाने आघाडी होऊ शकली नाही. आमच्याकडून आघाडीसाठी अजूनही दरवाजे उघडे आहेत. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत आघाडीची चर्चा प्रगतीपथावर असल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले. मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातही पक्षाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पक्षाला अनेक ठिकाणी दोनपेक्षा जास्त सक्षम उमेदवार मिळत असल्याने त्या ठिकाणी चर्चा करून अंतिम उमेदवार ठरवण्याचे काम सुरू आहे. शिवसेना-भाजपाची युती झाल्यास त्यांच्या पक्षातील तिकीट नाकारलेले उमेदवार कुठे जातात, ते आम्हाला बघायचे असल्याचे तटकरे यांनी सांगितले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget