मुंबई रोजगार स्वयंरोजगार व कौशल्य विकास मेळावा संपन्न

मुंबई : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि परळ येथील महालक्ष्मी सहकारी गृहनिर्माण संस्था व मुंबई प्रदेश जनकल्याण, शिक्षण अन्याय, भ्रष्टाचार निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने परळ येथे नुकतेच रोजगार व स्वयंरोजगार कौशल्य विकास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 
या मेळाव्यास शासनाच्या रोजगार स्वंयरोजगार व कौशल्य विकास विभागाचे सहायक संचालक संजय म्हस्के, के. ई. एम. रुग्णालयाचे सहाय्यक अधिष्ठाता प्रवीण बांगर, मुंबई प्रदेश जनकल्याण भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्रकाश फुटाणे, महालक्ष्मी गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद गावडे व सचिव संजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सहाय्यक अधिष्ठाता प्रवीण बांगर म्हणाले, या मेळाव्याच्या माध्यमातून युवक-युवतींना रोजगारासाठी उत्तम मार्गदर्शन मिळेल. रोजगारांच्या संधीही उपलब्ध होतील. नामवंत संस्थेमार्फत उमेदवारांना प्रशिक्षण देऊन नोकरीची संधी देण्यात येणार असल्याबद्दल श्री.बांगर यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी बोलताना सहायक संचालक संजय म्हस्के म्हणाले, शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येत असून उमेदवारांना रोजगार मिळण्यासाठी निश्चितच याचा लाभ होईल. उमेदवारांनी या संधीचा फायदा करुन घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या मेळाव्यास सुमारे ५०० ते ६०० उमेदवार उपस्थित राहिले होते. यावेळी उमेदवारांना ऑनलाईन भरती, करिअर गाईडन्स, बुद्ध्यांक चाचणी अशा विविध विषयावर तज्ज्ञांकडून व्याख्यानाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले.

आमदार अजय चौधरी व नगरसेवक नाना अंबोले यांनीही या मेळाव्यास भेट देऊन उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.

मुंबई प्रदेश जनकल्याण व भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्रकाश फुटाणे हा मेळावा यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget