जी.प., पं. स.साठी १६ व २१ फेब्रुवारीला तर महापालिकांसाठी २१ फेब्रुवारीला मतदान

२३ फेब्रुवारीला एकाच दिवशी मतमोजणी
मुंबई - राज्यातील मुंबईसह 10 महापालिकांच्या, 25 जिल्हा परिषदा व 283 पंचायत समितींच्या निवडणुकीचे बिगुल आज वाजले. सर्वांचे लागून राहिलेल्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी जाहीर केला. राज्यातील 10 महापालिकेच्या निवडणुकांसाठी 21 फेब्रुवारीला एकाच मतदान होणार आहे. जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्याचे मतदान मात्र दोन टप्यात 16 आणि 21 फेब्रुवारीला होणार असून 23 फेब्रुवारीला एकाच दिवशी मतमोजणी होणार आहे. 

पहिल्या टप्प्यात 15 जिल्हा परिषदा आणि 165 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर दुस-या टप्प्यात 10 जिल्हा परिषद आणि 118 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्याने आतापासून मतमोजणी संपे पर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे.

मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, नागपूर, अकोला, अमरावती, सोलापूर या 10 महानगरपालिकांची मुदत 10 मार्च ते 3 एप्रिल या दरम्यान संपत असल्याने या महापालिकांच्या नियमाप्रमाणे त्यांची मुदत संपण्या आधी निवडणुका घेणे कर्मप्राप्त आहे. तसेच मार्च एप्रिल महिन्यात दहावी बारावीच्या परीक्षा व शिक्षक आमदार निवडणूक असल्याने महापालिकांच्या निवडणूका 21 फेब्रुवारीला घेण्यात येणार असल्याचे सहारिया यांनी संगीतले. 5 जानेवारीला केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार याद्या आमच्या ताब्यात दिल्या असून या याद्या 12 जानेवारीला महापालिकांना आपल्या वेबसाईटवर प्रदार्शित करायच्या आहेत. 12 ते 17 जानेवारी दरम्यान या याद्यांवर सूचना व हरकती मागवून 21 जानेवारीला अंतिम मतदार याद्या जाहीर केल्या जाणार आहेत. 

नगरपालिका निवडणुकांप्रमाणेच महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या निवडणुकांसाठी उमेदवारांनी कॉम्युटराज्ड फॉर्म भरून निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा करावेत जेणे करून अर्ज बाद होणार नाही असे सहारिया यांनी सांगितले. निवडणुकीमध्ये भाग घेणाऱ्या उमेदवाराना पंचायत समितीसाठी 2 लाख, जिल्हा परिषदेसाठी 3 लाख, ब वर्गाच्या महापालिकांसाठी 4 लाख तर अ वर्गाच्या महापालिकांसाठी 5 लाख रुपये खर्चाची मुदत देण्यात आली आहे. उमेदवाराने आपला खर्च चेक किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाने करावा तसेच केलेल्या खर्चाचा अहवाल निवडणूक संपल्यावर एक महिन्यात सादर करावा असे आवाहन सहारिया यांनी केले आहे.

महानगरपालिका निवडणुक २०१७ कार्यक्रम
दि. २७/१/२०१७ ते दि.३/२/२००७ पर्यंत फाॅर्म भरणे
दि.૪/२/२०१७ फाॅर्म छानणी
दि.७/२/२०१७ फाॅर्म माघारी घेणे
दि.५/२/२०१७ निवडणूक चिन्ह वाटप
दि.१९/२/२०१७पर्यंत प्रचार करणे
दि.२१/२/२०१७ राेजी मतदान
दि.२३/२/२०१७ राेजी मतमाेजणी
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget