मतदार यादीतील घोळ पुन्हा चव्हाट्यावर > निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी

मुंबई, सोमवार (प्रतिनिधी)- महापालिका निवडणूक महिनाभरावर येऊन ठेपली असताना राज्य निवडणूक आयोगाच्या मतदार यादीतील घोळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अंतिम मतदार यादीत लोकसंख्येपेक्षा मतदारच जास्त असल्याचा प्रकार कॉंग्रेसने उघडकीस आणला आहे. याबाबत त्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली असून सुधारित निवडणूक तयार होत नाही, तोपर्यंत निवडणूक पुढे ढकलावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, यापूर्वी शिवसेनेने मतदार यादीतील घोळ समोर आणला होता.

मुंबई महापालिकेचे 227 प्रभाग आहेत. या प्रभागांच्या रचनेत मोठा बदल झाला असून शहरातील लोकसंख्या कमी झाल्याने उपनगरात प्रभाग वाढवले. महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त, कोकणविभाग तसेच मुंबई शहर व उपनगरातील जिल्हाधिकाऱ्यांनी एक समिती नेमून प्रभागांची विभागणी केली. बदलेल्या प्रभाग रचनेनुसार मतदारांची चाचपणी करण्यासाठी इच्छूक उमेदवारांनी सुरुवात केली. परंतु, मतदार यादीत घोळ असल्याने मतदारांचा शोध घेण्यासाठी इच्छूकांची तारांबळ उडाली आहे. प्रारूप मतदार यादीत आर उत्तर विभागातील प्रभाग क्रमांक एकमध्ये ... मतदारांची नोंद होती. मात्र, अंतिम मतदार यादीत तब्बल 1200 मतदारांची नावे एकाच पत्त्यावर नोंदवली गेल्याचे समोर आले आहे. प्रभाग 194 मध्येही हीच परिस्थिती आहे. या विभागात 58160 लोकसंख्या असून मतदारांच्या संख्येत मात्र तीन हजारने वाढ झाली आहे. यामुळे मतदारांची संख्या सुमारे 61 हजारहून अधिक झाली आहे. सत्ताधाऱ्यांनी ही जाणीवपूर्वक मतदार यादी तयार केली आहे, असा आरोप मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष शितल म्हात्रे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. जोपर्यंत यात बदल होत नाही, तोपर्यंत निवडणूक पुढे ढकलावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी निवडणूक विभागाला यांना पत्र पाठवून याबाबत लक्ष वेधण्याची मागणी केली होती. हाच प्रकार भाजपच्या घाटकोपर येथील नगरसेविका रितू तावडे व प्रभादेवी येथील मनसेचे नगरसेवक संतोष धुरी यांच्या प्रभागामध्येही घडला होता. आता कॉंग्रेसने देखील मतदार यातील घोळाबाबत आवाज उठवल्याने मतदार यादीबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केला जातो आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]

mumbaivarta

{google-plus#https://plus.google.com/u/0/}

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget